29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
HomeराजकीयAam Aadmi Party : महाराष्ट्रातल्या वादांचा लाभ आम आदमी पार्टी उठवू शकते

Aam Aadmi Party : महाराष्ट्रातल्या वादांचा लाभ आम आदमी पार्टी उठवू शकते

महाराष्ट्रातल्या वादांचा लाभ आम आदमी पार्टी घेऊ शकते असे स्पष्ट संकेत हरि भाऊ राठोड यांनी आपल्या भाषणातून दिले आहेत. ते पुण्यात बोलत होते. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैर वापर करुन संपूर्ण देशात एक प्रकारची दहशत पसरवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.

महाराष्ट्रातल्या वादांचा लाभ आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) घेऊ शकते असे स्पष्ट संकेत हरि भाऊ राठोड यांनी आपल्या भाषणातून दिले आहेत. ते पुण्यात बोलत होते. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैर वापर करुन संपूर्ण देशात एक प्रकारची दहशत पसरवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजप ही एक नंबरची भ्रष्टवादी पाटी आहे अशा शब्दात आपच्या हरिभाऊ राठोडांनी भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात जे काही सुरु आहे. ते सामान्य जनतेला आवडलेले नाही. त्यांना बदल हवा आहे. त्यामुळे अनेक जण आम आदमी पार्टीकडे आशेने पाहत आहे असे  हर‍ि भाऊ राठोड म्हणाले. भाजपने पंजाब आणि महाराष्ट्रात जे केले तेच दिल्लीत करण्याचा प्रयत्न करीत आहे.

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरावर छापेमारी केली. देशातले एकूणच वातावरण पाहता आम आदमी पार्टीची गरज आहे. शिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे उच्च शिक्षीत आहेत. त्यांनी जनतेची नस पकडली आहे. त्यानंतर त्यांनी दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता आणली. त्यामुळेच आम्ही आपमध्ये प्रवेश केला असे राठोड यावेळी म्हणाले. आम्ही ओबीसींसाठी काम करतो.

ओबीसींच्या विविध प्रश्नांवर आमची चर्चा झाली आहे असेही हर‍ि भाऊ राठोड यावेळी म्हणाले. आधी महाविकास आघाडी सरकारने गोंधळ घातला. त्यानंतर नव्या सरकारने गोंधळ घातला आहे. मुंबई महापालिकेची वॉर्ड रचना आणि आरक्षणावरुन एवढा गोंधळ घातला आहे की, उमेदवाराला कळायला काहीच मार्ग नाही. फडणवीस या विषयी विधीमंडळात खोटे बोलले असाही हल्लाबोल राठोड यांनी यावेळी केला.

हे सुद्धा वाचा

Lakshman Hake News : ‘शिवसेनेत गेलेले लक्ष्मण हाके सरकारी पदाचा मलिदा हडपताहेत, लवकर हकालपट्टी करा’

Gautam Adani : गौतम अदानी ठरले जगातले तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती

अष्टविनायक दर्शन : सातवा गणपती पालीचा श्री बल्लाळेश्वर

आम आदमी पार्टीच्या आमदारांना 20 कोटींची ऑफर दिली. महाराष्ट्रात 50 खोक्यांची चर्चा सुरु आहे. हर‍ि भाऊ राठोड यांच्या या वक्तव्यामुळे आम आदमी पार्टीने देखील महाराष्ट्रात मोर्चे बांधणी सुरु केल्याचे संकेत मिळाले आहेत. कारण जनता महाराष्ट्रातल्या सगळयाच सरकारांना कंटाळली आहे.

त्यामुळे आम आदमी पार्टीकडे पर्यायाने पाहिले जाऊ शकते असे महाराष्ट्रातल्या आपच्या नेत्यांना वाटते. ते वाटणे स्वाभावीक आहे. कारण दोघांच्या भांडणात तिसरा लाभ घेतो हे सत्य आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, शिंदे फडणवीस, मनसे हे महाराष्ट्रातील राजकीय पक्ष असून,‍ त्यांच्या राजकारणाचा सर्वांनाच वीट आला आहे. त्यामुळे यांच्या भांडणाचा लाभ आम आदमी पार्टी ( Aam Aadmi Party)उठवू शकते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी