33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयआंबा पिकतो, रस गळतो, भाजपचा प्रचार जोर धरतो...

आंबा पिकतो, रस गळतो, भाजपचा प्रचार जोर धरतो…

आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो… असे बडबड गीत आपण बालपणी एकले आहे. पण हाच आंबा आता भाजपसाठी प्रचाराकरीता बहुगुणी ठरत आहे. रविवारी याचा प्रत्यय भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना आला. येत्या वर्षभरात राज्यातील ठाण्यासह १५ महापालिकांच्या आणि विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने मायक्रो लेवलवर प्रचारात आघाडी घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर यांनी भाजपाच्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांसाठी “आम की बात” स्नेह मेळावा आयोजित केला होता.

या मेळाव्याला भाजपाचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आ. केळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वाघुले, परिवहन सदस्य विकास पाटील, माजी उपमहापौर सुभाष काळे, सुनेश जोशी, महिला आघाडी अध्यक्षा मृणाल पेंडसे, व जुने कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यात सध्या एकनाथ शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपचे सरकार आहे. पण एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी दोन्ही पक्ष सोडत नाहीत. गेल्या आठवड्यात भाजप मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी नालेसफाईवरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली. ती कमी होती म्हणून की काय भाजप आमदार संजय केळकर यांनीही ठाण्यात नालेसफाई झालीच नाही असा सूर आळवला त्यामुळे मुंबईनंतर मुख्यमंत्री शिंदे यांना ठाण्यातील नालेसफाईची कामे पाहण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. या दौऱ्यात शिंदे यांनी आम्हाला सामील करून घेतले नाही, असा आरोप भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला. वास्तविक पाहता ही शिंदे यांना कोंडीत पकडण्याची खेळी होती. त्यात भाजपा यशस्वी आला.

ठाण्यात हे राजकारण सुरू असताना शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी भाजपा सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप केला. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कपोलकल्पित असा शब्द वापरून या आरोपाची हवा काढून दिली. त्यामुळे हे प्रकरण शांत झाले. पण ठाण्यातील राजकारण पाहिल्यास शिंदे यांच्या शिवसेनेला डि व च न्याची एक संधी भाजपा सोडत नाही. त्याला कारणही तसेच आहे. ठाणे विधानसभा आमदार भाजपचे केळकर आहेत. हा मतदार संघ आपल्याला मिळावा असे शिंदे गटाला वाटते.

हे सुद्धा वाचा

उत्कंठा वाढली, दहावीचा निकाल कधी लागणार ?

कुत्र्याचे झाले निधन, मालकाने घातले वर्षश्राद्ध

शरद पवारांनी निवृत्त IAS अधिकाऱ्याला दिले मानाचे स्थान !  

शिवसेना प्रवक्ते नरेश न्हास्के यांच्यासाठी ही जागा मिळावी अशी शिंदे गटाची इच्छा आहे. तेच भाजपला नकोय, त्यामुळेच त्यांनी केळकर यांच्या मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपापासून दुखावलेल्या कार्यकर्त्यांना या आम की बातच्या निमित्ताने साद घालण्याची खेळी भाजपने खेळली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात कोपरी – पाचपाखाडी, ठाणे, ओवळा – माजिवडा आणि मुंब्रा हे चार विधानसभा मतदार संघ येतात. यातील दोन मतदार संघ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे. मुंब्रा मतदार संघ जितेंद्र आव्हाड यांच्याकडे तर ठाणे हा भाजपाकडे आहे. नरेश म्हस्के यांचे पुनर्वसन करण्याचे आव्हान शिंदे यांच्यासमोर आहे. त्यामुळेच या मतदार संघाचा खुटा घट्ट करण्याचा प्रयत्न केळकर यांच्या निमित्ताने भाजपने केला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी