34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयpolitical party : 138 कोटी लोकसंख्येच्या देशात सुमारे 2044 राजकीय पक्ष

political party : 138 कोटी लोकसंख्येच्या देशात सुमारे 2044 राजकीय पक्ष

आपल्या भारत देशाची लोकसंख्या ही 138 कोटी असून, राजकीय पक्षांची संख्या ही 2044 इतकी आहे. निवडणुका जवळ आल्या की, आपल्यासमोर आपोआपच निवडणुक चिन्ह डोळया समोर येतात. एका चिन्हाने पक्षाला ओळख मिळते.

आपल्या भारत देशाची लोकसंख्या ही 138 कोटी असून, राजकीय पक्षांची संख्या ही 2044 इतकी आहे. निवडणुका जवळ आल्या की, आपल्यासमोर आपोआपच निवडणुक चिन्ह डोळया समोर येतात. एका चिन्हाने पक्षाला ओळख मिळते. त्या पक्षाच्या चिन्हाचे बटन दाबून मतदान करायचे असते. पुर्वी पक्षाच्या चिन्हावर शिक्का मारला जात असे. आता ईव्हीएम मशीन आल्या, त्या वेळपासून बटन दाबून मतदान केले जाते. आपल्या देशात सुमारे 2044 नोंदणी केलेले राजकीय पक्ष आहेत. आपल्याकडे अनेक पक्ष निघतात आणि बंद देखील होतात. त्यामुळे ठामपणे पक्षांची संख्या सांगता येणे शक्य नाही. परंतु दोन हजारहून अध‍िक राजकीय पक्ष आहेत. ते निवडणुकीमध्ये सहभागी होतात.

हे सुद्या वाचा

Mahadev Jankar : महादेव जानकर हे निर्मला सीतारमण यांच्यापेक्षाही सरस !

खळबळजनक ! राजकीय क्षेत्रात खळबळ, 100 ठिकाणी इनकम टॅक्सच्या धाडी

Radhika Apte : ‘या’ लाडक्या अभिनेत्रीचा आज वाढदिवस

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय जनता पक्ष हे सात पक्ष अख‍िल भारतीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. तर जनता दल युनायटेड, अण्णाद्रमुक, द्रविड मुन्नेत्र कळघम, शिवसेना यांसारख्या 51 पक्षांना त्यांच्या राज्यात मान्यता आहे. मान्यता नसलेले राजकीय पक्ष देखील निवडणुकीमध्ये सहभागी होतात. अशा राजकीय पक्षांमध्ये हरियाणा हे राज्य आघाडीवर आहे.

हर‍ियाणामध्ये 67, पंजाबमध्ये 57, मध्यप्रदेशमध्ये 48, तर गुजरातमध्ये 47 पक्ष हे मान्यता प्राप्त नाहीत.  उत्तर प्रदेशमध्ये 433 राजकीय पक्ष आहेत. दिल्लीमध्ये 272 राजकीय पक्ष आहेत. बिहारमध्ये 120 राजकीय पक्ष आहेत. तामिळनाडूमध्ये 140 राजकीय पक्ष आहेत. तर आंध्रप्रदेशमध्ये 83 राजकीय पक्ष आहेत. देशातील अनेक पक्षांच्या नावांमध्ये भारत, भारतीय, समाज, जनता, प्रजा, विकास, क्रांती क्रांत‍िकारी, आम, युवा, गांधी हे शब्द आहेत. तर देशातील 40 टक्के राजकीय पक्ष उत्तर प्रदेश, द‍िल्ली, बिहार, तामिळनाडू राज्यात आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी