30 C
Mumbai
Thursday, September 14, 2023
घरराजकीयअबू आझमींनी पुन्हा वंदे मातरम् वाद उकरून काढला; सभागृह 10 मिनिटासाठी तहकूब

अबू आझमींनी पुन्हा वंदे मातरम् वाद उकरून काढला; सभागृह 10 मिनिटासाठी तहकूब

वंदे मातरम् वाद आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे विळा-भोपळयाचे नाते आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आज विधानभवन परिसरामध्ये वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. मी वंदे मातरम् गीताचा आदर करतो पण मी ते म्हणू शकत नाही. माझा धर्म त्याला परवानगी देत नसल्याचे म्हटले आहे. यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अबू आझमी म्हणाले की, सभागृहामध्ये ज्यावेळी वंदे मातरम् होते तेव्हा मी उभा राहून त्याविषयी आदर व्यक्त करतो. पण मी ते म्हणू शकत नाही. याचे कारण माझा धर्म सांगतो की, अल्लाह ज्याने आकाश तयार बनवलं, ज्याने सूर्य, चंद्र, माणसं तयार केली. आम्ही त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणाच्याही समोर डोक टेकवू शकत नाही. हे माझ्या धर्मात सांगितेल आहे. मी काही कुणाचा अपमान करत नाही. पण सर्वोच्च न्यायालयाने हा अधिकार दिला आहे.

अबू आझमी म्हणाले, अध्यक्ष महोदय आम्ही वंदे मातरम म्हणू शकत नाही कारण आम्ही फक्त अल्लाहला मानतो, जगात कोणासमोरही आम्ही डोकं टेकवू शकत नाही. आईसमोरही आम्ही डोकं टेकत नाही. आमचा धर्म याची अनुमती देत नाही. तिथे तरुणांनी या घोषणा दिल्यानंतर परिस्थिती बिघडली. पोलिस आले आणि त्यांनी दोन्ही गटांना पांगवलं, पण रात्री पुन्हा 15 ते 20 लोक आले आणि घोषणाबाजी सुरू केली. यानंतर दोन्हीकडचे लोक जमा झाले. अबू आझमी बोलत असतानाच भाजप आमदार आक्रमक झाले आणि त्यांनी सभागृहात घोषणाबाजी केली. विधानसभेत वेलमध्ये येऊन आमदारांनी घोणाबाजी केली. यानंतर सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब झाले. यानतंर सभागृहाचं कामकाज सुरु झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिले.

हे सुद्धा वाचा 
अर्धेअधिक कोकण पाण्याखाली; नद्या दुथडी भरून वाहतातहेत, गावांचा संपर्क तुटला

उद्धव ठाकरे, अजित पवार भेटीने राजकीय चर्चांना उत

राज्यात पावसाची जोरदार हजेरी; रायगडसह पालघर, पुणे, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट

अबू आझमी यांना माझी विनंती आहे की या देशात करोडो लोकांची वंदे मातरम् बाबत श्रद्धा आहे. त्यांनी केलेले वक्तव्य योग्य नाही. असा कोणता धर्म सांगेल आपल्या आई समोर डोकं टेकवू नका. हे धर्म गीत नाही. वंदे मातरम् हे राष्ट्रगान आहे, चुकीचे अर्थ काढू नका. आपण संविधान मानतो म्हणून आपण इथे आलो. सभागृहाला देखील सुरुवात होत नाही. या सभागृहातही आपण वंदे मातरम् आणि जन गण मनं म्हणतो. त्यामुळे मला वाटतं ही भावना योग्य नाही, बाकी आपले मुद्दे आपण इथे मांडा. असे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी