26 C
Mumbai
Wednesday, November 29, 2023
घरराजकीयमहाघोटाळ्यातील रस्त्यांची कामे कधी सुरू होणार? आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

महाघोटाळ्यातील रस्त्यांची कामे कधी सुरू होणार? आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

आगामी महापालिकेच्या आगामी निवडणुका तोंडावर येताच राज्यातील विकास कामे करण्याकडे नेत्यांचा कल असतो. यावेळी अनेकदा कंत्राटदार विकास कामांमधून भ्रष्टाचार करत असतात. मात्र यावर आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त जबाबदार असतात. विकास कामावेळी शहरांना, कॉलन्यांना मिळालेला निधी हा निम्मा अर्धा कंत्राटदाराच्या खिशात जातो. मात्र यावर कुणीच बोलत नाही, विचार करत नाही. दरम्यान, ठाकरे गट शिवसेना आणि मुंबई महापालिका यांचे फार जुने नाते आहे. हिच महापालिका मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. पण रखडलेली कामे, वाहतुकीचे रस्ते यावर सरकार काहीच काम करत नाही. याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतात. त्यांनी मुंबईतील अनेक दिवसांपासून ठप्प असलेल्या रस्त्यांच्या कामावरून विरोधकांवर आक्रमक झाले. याबरोबर त्यांनी रस्ते घोटाळा, फर्निचर घोटाळयाबाबत महापालिका आयुक्तांना प्रश्न उपस्थित केला. महापालिका प्रशासन आणि कंत्राटदार यांच्या सिनिडिकेटबाबत आवाज उठवला. गेले १२ महिने आम्ही रस्त्यांचा विषय मांडतोय. ज्या शहरांमध्ये प्रशासक आहेत, तिथे घोटाळे सुरु आहेत. मुंबईत ५ कंत्राटदार आहेत. त्यापैकी एका कंत्राटदारास टर्मीनेशन नोटीस गेली, या नोटीशीला कंत्राटदाराने उत्तर दिलं असून त्याची सुनावणी महापालिकेत या आठवड्यात होणार आहे. तसेच बंद पडलेल्या रस्त्यांच्या कामावरून प्रशासकांनी सांगावे की, महाघोटाळ्यातील रस्त्यांची कामे कधी सुरु होणार? असा थेट प्रतिसवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे.

हे ही वाचा

मलायकाच्या सौंदर्याचं रहस्य कशात?

मलायकाच्या सौंदर्याचं रहस्य कशात?

मोदीसाहेब, हे घ्या तुमच्या आरोपाला उत्तर…

 

दरम्यान, कंत्राटदारांवर कारवाई होते की खोके घेऊन कारवाई थांबवली जाते, हे आम्हाला बघायचे आहे. मुंबईत रस्त्यांची कामे १ ऑक्टोबर ते ३१ मे पर्यंत पूर्ण होतात. मात्र एकाही रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली नाही. अडीच हजार कोटींची कामे तशीच पडून आहेत. ट्रॅफिक पोलिसांच्या एनओसी न मिळाल्याचे दाखवून रस्त्यांची कामे रखडवली जात आहेत. मोठा गाजावाजा करुन सहा हजार कोटीच्या कामांची घोषणा केली ,नारळ फोडला पण ती कामेही पडूनच आहेत.

त्याचप्रमाणे त्यांनी मुंबईतील डिलाईल ब्रिज रोड येथील पुलाची पाहणी केली होती, यावेळी काही दिवसांपासून ब्रिजचे काम बंद असल्याचे निदर्शणास आले. ब्रिज पाडणे म्हणजे राजकीय स्टंट आहे का? असा प्रतिसवाल आदित्य ठाकरेंनी विरोधकांना केला आहे. डिलाईल ब्रिज रोड पुलाच्या कामात दिरंगाई होत असल्याने आम्ही या पुलाचे नाव डिले ठेवणार आहे, अशी टीका करत त्यांनी विरोधकांचे कान टोचले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी