30 C
Mumbai
Monday, June 5, 2023
घरराजकीयज्येष्ठ ॲड. कपिल सिब्बल लढणार पीएम मोदींची केस; नेमकं प्रकरण काय?

ज्येष्ठ ॲड. कपिल सिब्बल लढणार पीएम मोदींची केस; नेमकं प्रकरण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिल्ली-भोपाळच्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन लोकार्पण सोहळ्यात जनतेशी संवाद साधताना विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधक त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचत असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यानंतर सिब्बल यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी यांनी तुमची प्रतिमा मलिन करणाऱ्यांची नावे सांगा, आपण त्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करू, असे सांगितले आहे. सत्तासंघर्षाच्या लढ्यात सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकिल सिब्बल (Adv. Kapil Sibal) आता पंतप्रधान मोदी यांच्या बाजूने लढणार असल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

पंतप्रधान मोदींनी शनिवार 1 एप्रिल रोजी दिल्ली-भोपाळच्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर विरोधकांवर हल्लाबोल केला.

ज्येष्ठ ॲड. कपिल सिब्बल लढणार पीएम मोदींची केस; नेमकं प्रकरण काय?
Photo Courtesy- twitter : Prime Minister Narendra Modi flagged off the Vande Bharat Express connecting Madhya Pradesh and Delhi.

मोदी म्हणाले की, काही लोकांनी शपथ घेतली आहे की, ते मोदींची प्रतिमा डागाळतील. यासाठी या लोकांनी वेगवेगळ्या लोकांना सुपारी दिली आहे. त्यांना आधार देण्यासाठी काही लोक देशात काम करत आहे. तर काही देशाबाहेरही काम करत आहेत. हे लोक सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे माझी प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करताहेत. पण आज भारतातील गरीब, मध्यमवर्ग, आदिवासी, दलित हे प्रत्येक भारतीय मोदींचे सुरक्षा कवच बनले आहेत, असे मोदींनी यावेळी स्पष्ट केले.

मोदींच्या या वक्तव्यानंतर ज्येष्ठ वकिल सिब्बल यांनी ट्विट करत वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘मोदी सांगत आहेत की, त्यांना बदनाम करण्याचा कट देशासह परदेशातही रचला जात आहे. तर मला व्यक्ती, संस्था आणि कोणत्या देशात तुमच्या बदनामीचे षडयंत्र रचले जात आहे त्यांची नावे सांगा. हे गुपित राहू शकत नाही. आपण त्यांच्यावर खटला चालवू.’ अशा आशयाचे ट्विट सिब्बल यांनी केलं आहे. यानंतर या वृत्ताने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

ॲड. कपिल सिब्बल
माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची गणना देशातील प्रसिद्ध वकीलांमध्ये केली जाते. ते प्रत्येक सुनावणीमध्ये त्यांनी केलेला युक्तीवाद हा कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी सखोल अभ्यासाचा विषय असतो. सध्या ते सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या ठाकरे-शिंदे सुनावणीत ठाकरे गटाच्या बाजुने युक्तीवाद केला आहे. दरम्यान आपल्या शिक्षण, अनुभव आणि वक्तृत्वाने ते प्रभावीपणे आपले मुद्दे मांडताना दिसतात.

हे सुद्धा वाचा:

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष : सरन्यायाधीशांचे राज्यपालांच्या भूमिकेवर तीक्ष्ण सवाल

भाजपच्या भ्रष्टाचार वॉशिंग मशीनच्या विरोधात उभे राहण्याची हीच ती वेळ

नरेंद्र मोदींचा २०२४ मध्ये पराभव अटळ (माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा विशेष लेख)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी