30 C
Mumbai
Thursday, August 17, 2023
घरराजकीयपक्ष फोडाफोडीनंतर भाजपा लागली 'वॉर रूम'च्या पाठी, भाजपचा नवा 'मेगा प्लॅन'...

पक्ष फोडाफोडीनंतर भाजपा लागली ‘वॉर रूम’च्या पाठी, भाजपचा नवा ‘मेगा प्लॅन’ तयार

गेल्या वर्षी शिवसेना फोडून, जूनमध्ये राष्ट्रवादीला धक्का देऊनही राज्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भाजपा नापास होत असल्याचे निदर्शनास येताच, भाजपने नवा ‘मेगा प्लॅन’ तयार केला आहे. त्यानुसार आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची भाजपने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपच्या विद्यमान आमदार-खासदारांना त्यांच्या मतदारसंघात ‘वॉर रुम’ सुरू करण्याच्या सूचना पक्षाकडून जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आपल्या जिवावर लढण्याची तयारी भाजपने केली आहे.

ज्या ठिकाणी भाजपचे आमदार-खासदार नाहीत तेथे मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुख नियुक्त करण्यात आले असून तेथेही ‘वॉर रूम’ सुरू करण्याच्या सूचना भाजपने दिल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना वाढवण्यासाठी आणि सरकारचे काम जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपने ‘मेगा प्लॅन’ तयार केला आहे. राज्यातील ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघात भाजपची निवडणूक ‘वॉर रूम’ महिनाभरात सुरू होणार असून महाजनसंपर्क अभियानही राज्यभरात भाजप सुरू करणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघात ६० हजार घरी जाऊन किमान ३० हजार नागरिकांच्या मोबाईलवर ‘सरल ॲप’ सुरू करण्याचा भाजपचा संकल्प आहे. याबरोबरच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व्हॉट्सॲपचे ग्रुप तयार करावेत आणि प्रत्येक आमदार, खासदार व निवडणूक प्रमुखाने सोशल मीडियावर सक्रिय राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या आहेत. आता जे मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना सोडले जातील, तेथेही भाजपचे निवडणूक प्रमुख असतील, आणि ‘वॉर रूम’चा त्यांनाही फायदा होईल, असे सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
हे सुद्धा वाचा
भाजपाच्या राजकारणामुळे सामान्य जनतेचे जीवन उद्‌ध्वस्त होतेय – शरद पवार
संविधान बदलासंदर्भातील वक्तव्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुलासा करावा -नाना पटोले
सरकार जनतेच्या जीवाशी खेळतेय; ७ वर्षांत आरोग्य खात्याने ११ हजार ५०२ कोटींच्या निधीला लावली कात्री

दरम्यान, लोकसभा निवडणुका या भाजपने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघातून जास्त खासदार निवडून आणण्याचे लक्ष्य भाजपने दिलेले आहे. त्यासाठीच की काय भाजपने ‘मेगा प्लॅन’ तयार केला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्याची सत्ता समीकरणेही बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी