36 C
Mumbai
Tuesday, March 14, 2023
घरराजकीयकृषीमंत्री अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा; विधानभवनाच्या पायऱ्यांवर NCPचा राडा

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा; विधानभवनाच्या पायऱ्यांवर NCPचा राडा

कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राज्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे संतप्त झालेले विरोधी पक्षाच्या आमदारांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिंदे-फडणवीस सरकरविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आले.

आज अधिवेशन सुरू असताना, विरोधी पक्षनेते @AjitPawarSpeaks आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत महाविकास आघाडीच्या आमदारांनी राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी ‘असंवेदनशील कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा’, ‘गद्दार सत्तार हाय हाय’, ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या अब्दुल सत्तार यांचा धिक्कार असो’, ‘किसानों के गद्दारोंको जुते मारो सालों को’, ‘शेतकऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘पन्नास खोके एकदम ओके’, ‘बोलाचीच कढी बोलाचिच भात जेवोनिया तृप्त कोण झाला’, ‘यंदाचा अर्थसंकल्प वाया गेला’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मागील आठवड्यात मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. अवकाळीने मका, गहू, हरभरा, कापसाचं मोठं नुकसान झाल्याने बळीराजावर आभाळ कोसळलंय. या नुकसानीची पाहणी आज कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांनी संवाद साधला. माझ्या मतदारसंघात फिरुन आलो. शेतीचं फार काही नुकसान झालेलं नाही, असं सांगताना जिथे नुकसान झालंय तिथे पंचनाम्याचे आदेश दिले आहेत, असं ते म्हणाले होते.

काय म्हणाले होते कृषीमंत्री?

“शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणार आहे.” माझ्या मतदारसंघात फिरुन आलो, शेतीचं फार नुकसान झालं नाही. वस्तूनिष्ठ पंचनाम्यासाठी सोयगावला जावून आलो. मोठं नुकसान नाही परंतु जे नुकसान झालं त्याचं पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत, असंही सत्तार यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा : 

शेतकरी आत्महत्येवर कृषिमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी

संजय राऊत म्हणाले; औरंगजेबजी, कसाबजी, शाहिस्तेखानजी, अब्दुल गुरूजी…

संजय राऊतांना परिणाम भोगावे लागतील; अब्दुल सत्तारांचा इशारा

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी