27 C
Mumbai
Tuesday, March 26, 2024
Homeराजकीयशेतकरी आत्महत्येवर कृषिमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी

शेतकरी आत्महत्येवर कृषिमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी

गेल्या आठवड्याभरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. विशेष म्हणजे यातील तीन शेतकरी कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांच्या मतदारसंघातील आहे. यानिमित्ताने मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. याचविषयी कृषिमंत्र्यांना प्रश्न विचारला असता सत्तार यांनी अतिशय धक्कादायक वक्तव्य केलंय.

मागील आठवड्यात मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. अवकाळीने मका, गहू, हरभरा, कापसाचं मोठं नुकसान झाल्याने बळीराजावर आभाळ कोसळलंय. या नुकसानीची पाहणी आज कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांनी संवाद साधला. माझ्या मतदारसंघात फिरुन आलो. शेतीचं फार काही नुकसान झालेलं नाही, असं सांगताना जिथे नुकसान झालंय तिथे पंचनाम्याचे आदेश दिले आहेत, असं ते म्हणाले.

मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतायेत. विशेषत: तुमच्याच मतदारसंघात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर त्यावर उत्तर देताना सत्तार म्हणाले, “शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणार आहे.” माझ्या मतदारसंघात फिरुन आलो, शेतीचं फार नुकसान झालं नाही. वस्तूनिष्ठ पंचनाम्यासाठी सोयगावला जावून आलो. मोठं नुकसान नाही परंतु जे नुकसान झालं त्याचं पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत, असंही सत्तार यांनी सांगितलं.

दरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरोधात आज विरोधकांनी विधानसभा पायऱ्यांवर आंदोलन करून कृषिमंत्री सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता यावर शासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हे सुद्धा वाचा :

संजय राऊतांना परिणाम भोगावे लागतील; अब्दुल सत्तारांचा इशारा

क्लास वन अधिकारी कल्याणकारी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात; आजपासून सामूहिक रजेवर, सिल्लोडमधील अब्दुल सत्तार यांच्या कृषि महोत्सवावर बहिष्कार

कर्जमाफी योजना असूनही महाराष्ट्रात २०२२ मध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी