33 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरराजकीयअजित पवार भूमिकेवर ठामच; स्वराज्यरक्षक ही उपाधी व्यापक आणि सर्वसमावेशक

अजित पवार भूमिकेवर ठामच; स्वराज्यरक्षक ही उपाधी व्यापक आणि सर्वसमावेशक

छत्रपती संभाजी महाराजांना (Sambhaji Maharaj) स्वराज्यरक्षक (Swarajyarakshak) म्हणायचे की धर्मवीर (Dharamvir) म्हणायचे याबद्दल माझी भूमिका ही स्वराज्यरक्षकच म्हणावे अशी आहे. परंतू पवारसाहेबांनी जे म्हटले कुणी धर्मवीर म्हणत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. स्वराज्यरक्षक ही उपाधी अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक आहे असे मला वाटते. धर्मवीर उपाधी कुणाकुणाला मिळाली पहा, जवळपास सात-आठ लोकांनी स्वत:ला धर्मवीर उपाधी लावली आहे. संभाजी महाराजांना काहीजण धर्मवीर म्हणतात हे सर्वांच्या पाहण्यात आले आहे. पण तशाचपद्धतीच्या उपाधी इतरांना दिलेल्या आहेत. काहींचे तर चित्रपट निघाले आहेत, आता धर्मवीर भाग २ चित्रपट देखील निघणार आहे. छत्रपती संभाजींना धर्मवीर म्हणत असाल तर दुसरी कुणी तशी व्यक्ती होऊच शकत नाही, अशी भूमिका आज विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकारपरिषदेत मांडली. (Ajit Pawar clarified his position on the statement regarding Sambhaji Maharaj)

विधिमंडळ अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्यावेळी मी केलेल्या भाषणातील काही मुद्दयांवर गेल्या दोन एक दिवसांत सातत्त्याने बऱ्याच घटना महाराष्ट्रात घडत आहेत. मला जनतेला सांगायचे आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आम्ही काम करत होतो तेथे ११ मार्चला अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थसंकल्पाच्या पहिल्याच पानावर कदाचीत लोक विसरले असतील म्हणून आठवण करुन देतो. महाराष्ट्राची अस्मिता स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक वढू बुद्रकु येथे उभारण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यासाठी मविआ सरकारतर्फे २५० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच संभाजीमहारा याच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले होते.

मी इतिहासाचा संशोधक नाही, त विषय इतिहास संशोधकांचा आहे. मध्यंतरी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, खासदार अमोल कोल्हे यांनी तपशीलवार विवेचन केलेले माझ्या समोर आले, यापुढे वस्तूनिष्ठ पद्धतीने इतिहासकारांनी मांडणी करावी, लोकांच्या प्रबोधनासाठी ती उपयुक्त ठरेल, राजकीय हेतुने, द्वेशापाटो राजकारण करणे कदापी मला मान्य नाही, पूराव्यांच्या आधारे इतिहासाची सतत नव्याने मांडणी होत असते. रामदासस्वामी, दादोजी कोंडदेव छत्रपती शिवरायांचे गुरू नाहीत. हे इतिहासकारांनी मांडले ते लोकांनी मान्य केले, त्यानंतरच सरकारने दादोजी कोंडदेव पुरस्कार बंद केला.
अजित पवार म्हणाले, शिवरायांना गोब्राह्मणप्रतिपालक अनेकवर्षे म्हटले जात होते, म. फुले यांनी शिवाजी महाराजांना कुळवाडीभूषण म्हटले आहे. गोब्राह्मणप्रतिपालक म्हणणे चुकीचे नाही पण तसे म्हणणे छत्रपती शिवरायांना एका मर्यादीत कृतीत बंदीस्त करण्यासारखे आहे. धर्मवीर या छत्रपती संभाजी महाराजांच्या उपाधीचे देखील तसेच आहे, त्यामुळे संभाजीमहाराजांचे कर्तृत्व मर्यादीत होते. हिंदवी स्वराज्याची संस्थाना शिवाजी महाराजांनी केली तशी दुसरी व्यक्ती शिवाजी महाराज होऊच शकत नाही. तशा पद्धतीने स्वराज्यरक्षकाची जबाबदारी संभाजीमहाराजांनी पार पाडली. दुसऱ्या कुणाला स्वराज्यरक्षक म्हणता येणार नाही असे माझे मत आहे. माझे मत तुम्हाला पटलेच पाहिजे असा माझा दावा नाही. विचारस्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. फक्त भूमिका मांडत असताना आपल्याला जे काही संविधानाने ठरवून दिलेले आहे, त्याबाहेर जावून ती भूमिका मांडता कामा नये हेच मला सांगायचे आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवार म्हणाले, माझ्यासमोर संभाजी महाराजांबद्दल दोन पद्धतींचे लिखाण

आंबेडकरवादी नेते जोगेंद्र कवाडे एकनाथ शिंदे यांच्या कळपात; आता महाराष्ट्रभर घेणार सभा

अजित पवार यांच्या छ. संभाजी महाराजांबद्द्लच्या विधानावरुन भाजप-शिंदे गट आक्रमक

त्यामुळे मी काही खुप मोठी चुक केलेली आहे, असे माझे अजिबात म्हणणे नाही, मी माझी भूमिका मांडली ज्याला योग्य वाटेल त्याने स्विकारावी. ज्यांना योग्य वाटत नाही त्यांनी सोडून द्या आम्ही काय धरुनच ठेवा असे म्हणत नाही. पण त्यासंदर्भात बाकीच्यांनी मला काही सांगण्याचे कारण नाही त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा त्यांनी त्यांच्या पक्षाच्या संदर्भात काय भूमिका घ्यायची ती घ्यावी. अजित पवार म्णाले, लक्ष विचलीत करण्यासाठी काय करायचे यासाठी बसून ठरवले जाते. मी ज्यावेळी सभागृहात बोललो त्यावेळी कोणी काही बोलले नाहीत. पण ही क्लूप्ती लढवणारा मास्टरमांईड त्यावेळी सभागृहात नव्हता. ते बाहेरच होते. मग त्यांच्या कल्पनेतून हे बाहेर आले. त्यानंतर सगळीकडे आंदोलन मोर्चे काढा असे आदेश आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी