33 C
Mumbai
Monday, March 25, 2024
HomeराजकीयAjit Pawar : अजित पवार म्हणाले, राज्यात दोनच 'टिकोजीराव', जाणून घ्या कुणाबद्दल...

Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, राज्यात दोनच ‘टिकोजीराव’, जाणून घ्या कुणाबद्दल…

अद्याप मंत्रिमंडळ विस्तार नसल्याने सगळ्याच खात्यांची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आली आहे, त्यामुळे कामाचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्या त्या विभागील प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामे पाहण्यास सांगितले आहेत. हाच मुद्दा उपस्थित करत अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना फटकारले आहे.

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यामुळे शिंदे – फडणवीस सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. विरोधी गटातून सुद्धा याबाबत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. केवळ दोन डोक्यांच्या सरकारला संपुर्ण राज्याचा गाडा हाकणे अवघड झाले आहे, अशातच मंत्रालयातील जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सचिवांना दिल्यामुळे विरोधक खवळले असून सत्ता चालवण्याच्या या नव्या पद्धतीवर सडकून टीका करीत आहे. दरम्यान अजित पवार यांनी सुद्धा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत राज्यात दोनच टीकोजीराव असे त्यांनी संबोधले आहे. यावेळी बोलताना सचिवांना अधिकार देण्यावरून सुनावले आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील वेगवेगळ्या घडामोडींचा आढावा घेऊन नव्या सरकारला चांगलेच धारेवर धरले. यावेळी बोलताना पवार म्हणाले, राज्यातील सरकार पाडून यांनी महाराष्ट्र अस्थिर केला. त्यांनी लोकशाहीचा खून केला. जे अधिकार तुम्ही अधिकार व प्रशासनाला देता, तसेच अधिकार मुख्य सचिवांना देऊन घरी बसा असे म्हणून त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयाला टोला लगावला आहे.

Azadi ka Amrut Mahotsav : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष विद्यार्थ्यांच्या, नागरिकांच्या ‘उपेक्षां’नी होणार साजरे

Kanumata Festival : खान्देशात कानुमातेच्या उत्सवाचा जल्लोष, उद्या होणार विसर्जन

Ganpatrao Deshmukh : विधानसभेचे विद्यापीठ !

अद्याप मंत्रिमंडळ विस्तार नसल्याने सगळ्याच खात्यांची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आली आहे, त्यामुळे कामाचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्या त्या विभागील प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामे पाहण्यास सांगितले आहेत. हाच मुद्दा उपस्थित करत अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना फटकारले आहे. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यात आता दोनच टिकोजीराव आहेत. सगळे अधिकार प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच करायचे असेल तर होघांनी सर्व अधिकार मुख्य सचिवांना देऊन टाका आणि घरी बसा असे म्हणून शिंदे – फडणवीस सरकारच्या राज्यकारभारावर त्यांनी सवालच उपस्थित केला आहे.

अजित पवार पुढे म्हणाले, लोकशाहीच्या नियमांना डावलून हे सरकार अस्तित्वात आले. सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असे वारंवार सांगितले जाते. पण खूप जणांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले असावे, म्हणून हा विस्तार होत नसून नेमकं काय चाललंय  हे राज्याला समजले पाहिजे.  सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. हर घर तिरंगा मोहिमेसाठी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री तरी पाहिजेत. पण, हम दो म्हणत असले तरी ते मिस्टर इंडिया बनून कारभार करू शकत नाही असे म्हणून त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना खडे बोल सूनावले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी