29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
HomeराजकीयAjit pawar : अजित पवारांची पुन्हा फटकेबाजी, सत्ताधारी बावचळले

Ajit pawar : अजित पवारांची पुन्हा फटकेबाजी, सत्ताधारी बावचळले

आजचा अधिवेशनाचा दुसरा दिवस सुद्धा वादळी ठरला. वेगवेगळे मुद्दे उपस्थित करीत विरोधकांनी सत्ताधारांचे तोंड बंद केले, तर वेगवेगळ्या नवीन उपाययोजनांची माहिती सत्ताधाऱ्यांनी अधिवेशनाच्या पटलावर मांडली. दरम्यान पुढील दिवसांमध्ये आणखी कोणते मुद्दे गाजणार आणि कोणाचे पारडे जड ठरणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आ

शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर कालपासून राज्याचे पहिले विधिमंडळ अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून सभागृहात आजसुद्धा शब्दांची चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. नेहमीप्रमाणे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले असून त्यांच्या आज शाब्दिक फटकेबाजीमुळे सत्ताधारी सुद्धा बावचळून गेले. पालघरच्या हत्ती रोगाचा मुद्दा आणि जास्त गर्भपातात होणाऱ्या जिल्ह्यासाठी वापरलेला ‘फेमस’ हा शब्द याबाबतीत तानाजी सावंत यांनी सभागृहात जी वक्तव्ये केली त्यावर अजित पवार यांनी उत्तर देत सावंत यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. “गर्भपाताच्या घटनांमुळे बीड जिल्हा हा ‘फेमस’ आहे” असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी सभागृहात केले होते.

सभागृहात वेगवेगळ्या मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांची जुंपली असताना त्यावेळी पालघर येथील हत्तीरोगाचा वाढता प्रादुर्भाव आणि बीड येथील वाढत्या गर्भपाताच्या मुद्यावरून अजित पवार चांगलेच संतापले. पालघर जिल्ह्यातील वाढणाऱ्या हत्तीरोगाच्या प्रादुर्भावावर होणाऱ्या उपाययोजनांविषयी जिल्ह्यातील आमदारांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जिल्ह्यात सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. दरम्यान, यावर प्रश्न उपस्थित करत पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या एकूण जागा, रिक्त जागा आणि भरलेल्या जागा याची माहिती द्या, असा सवालच त्यांनी यावेळी केला.

हे सुद्धा वाचा

Nashik Central Jail Attack : कैद्यांचा जीवघेणा हल्ला, पोलिसाचे फोडले डोके

Vinod Kambali : माजी स्टार क्रिकेटर विनोद कांबळी कामाच्या शोधात

Nitin Gadkari : भाजपकडून नितीन गडकरींना दुजाभाव?

अजित पवार यांनी अचानक केलेल्या या प्रश्नामुळे तानाजी सावंत यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्याक्षणी सावंत  त्यांच्याकडे कोणतीच माहिती उपलब्ध नव्हती, परंतु त्यांनी त्यावेळी अर्ध्या तासात अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन सभागृहाला याबाबत माहिती देणार असल्याचे सांगितले. त्यावर अर्ध्या तासात ही माहिती उपलब्ध होणार नाही असे लक्षात आल्याने विधानसभा अध्यक्षांनी ही माहिती सोमवारी सादर करण्याचे सावंत यांना सांगितले आणि हा विषय इथेच संपवण्यात आला.

दरम्यान, बीड तालुक्यातील बक्करवाडी येथील एका महिलेचा अवैध गर्भपाताचा मुद्दा उपस्थित झाल्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली. या घटनेवर “गर्भपाताच्या घटनांमुळे बीड जिल्हा हा फेमस आहे”, असे तानाजी सावंत यांनी सांगितले त्यामुळे सभागृहातील वाद आणखीच वाढला. खरंतर ‘फेमस’ या शब्दाचा अर्थ ‘लोकप्रिय’ असा होतो त्यामुळे सावंत यांनी वापरलेल्या ‘फेमस’ या शब्दावर ठाकरे गटातले आमदार सुनिल प्रभू यांनी निषेध व्यक्त केला. यानंतर सावंत यांच्यानंतर मंत्री शंभूराज देसाई सुद्धा उठले आणि तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी अजित पवार यांनी तर फेमस हा शब्द बीड जिल्ह्याचा अपमान करणारा असून तो कामकाजातून वगळण्यात यावा अशी सूचनाच केली.

आजचा अधिवेशनाचा दुसरा दिवस सुद्धा वादळी ठरला. वेगवेगळे मुद्दे उपस्थित करीत विरोधकांनी सत्ताधारांचे तोंड बंद केले, तर वेगवेगळ्या नवीन उपाययोजनांची माहिती सत्ताधाऱ्यांनी अधिवेशनाच्या पटलावर मांडली. दरम्यान पुढील दिवसांमध्ये आणखी कोणते मुद्दे गाजणार आणि कोणाचे पारडे जड ठरणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी