१४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी ‘गो माता आलिंगन दिन’ साजरा करण्याचे आवाहन केंद्र, सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने लोकांना केले होते. केंद्राच्या या हास्यास्पद प्रस्तावावर सर्वच स्तरांतून कडाडून टीका झाल्यानंतर आता केंद्राला उपरती सुचली आहे. हा निर्णय मागे घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. गायीसमोर एकदा ये आणि मग बघ तुझा ‘हग डे’ कसा होतो? असे प्रति आवाहन अजित पवार यांनी हा प्रस्ताव लोकांसमोर मांडणाऱ्या सरकारी बाबूंना केले आहे. ते म्हणाले,” फ्लॅट संस्कृतीमध्ये वाढलेल्यांना गाव, गाय, रेडकू, म्हैस, वासरु याबद्दल काही माहित आहे का? ‘काऊ हग डे’ करायला निघाले”. अशा उपरोधिक शैलीत अजित पवार यांनी या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. (Ajit Pawar has ridiculed this decision in an ironic style)

मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना लातूर आणि परभणी या दोन ठिकाणी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी केंद्राच्या या प्रस्तावाचा समाचार घेतला आहे. फ्लॅट संस्कृतीत वाढेलयांना गाव, गाय, रेडकू, म्हैस, वासरु याबद्दल काही माहितीये का? असा प्रश्न त्यांनी संबंधित सरकारी बाबूंना विचारला आहे. ते म्हणाले. “फ्लॅट संस्कृतीमध्ये वाढलेल्यांना गाव, गाय, रेडकू, म्हैस, वासरु याबद्दल काही माहितीये का? ‘काऊ हग डे’ करायला निघाले”. फेब्रुवारी महिन्यात विविध ‘डे’ तरुणाई साजरी करत असते. पण केंद्र, सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने ‘काऊ हग डे’ हा एक नवीन दिवस सुरु केला आहे, असे सांगत अजित पवार यांनी सरकारी बाबूंवर तोंडसुख घेतले आहे. ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी ही अधिसूचना जारी केली आहे, त्या दिवट्यांचा शेणाशी, मातीशी, शेतीशी काही संबंध नाही. यांना मेढंरं म्हणजे काय? विचारलं तर सांगता यायचं नाही, अशा भाषेत पवार यांनी त्यांना सुनावले आहे.
हे सर्व थोतांड
मी अनेकवर्षांपासून शेती करत आलो आहे. गाईला गोंजारलं जातं, हे मला माहिती होतं. पण गाईला मिठी मारणं हे मी पहिल्यांदाच ऐकतो आहे. गाय मारकी असली तर शिंगावर घेतल्याशिवाय गप्प बसायची नाही. दिल्लीत बसलेले अधिकारी काय लिहितात, त्यांचं त्यांनाच माहीत नाही. त्यांना म्हणावं, ये एकदा गाईसमोर तुझा ‘हग डे’ कसा होतो ते पाहा. फ्लॅट संस्कृतीमध्ये वाढलेल्यांना गाव, गाय, रेडकू, म्हैस, वासरु याबद्दल काही माहितीये का? ‘काऊ हग डे’ करायला निघाले, हे सर्व थोतांड आहे.
हे सुद्धा वाचा
Ajit Pawar : अब्दुल सत्तारांना विनाश काले विपरीत बुध्दी; अजित पवारांनी थेट घेतला खरपूस समाचार
Ajit Pawar : अजित पवारांनी प्रसार माध्यमांना सुनावले
Ajit Pawar : या सरकारचा पर्दाफाश करणार, अजित पवारांकडून सूचक वक्तव्य