28 C
Mumbai
Monday, September 5, 2022
घरराजकीयAjit Pawar : फडणवीसांचे म‍ित्र प्रेम,अजित पवारांकडेच 'देवगिरी' बंगल्याच्या चाव्या

Ajit Pawar : फडणवीसांचे म‍ित्र प्रेम,अजित पवारांकडेच ‘देवगिरी’ बंगल्याच्या चाव्या

महाराष्ट्राच्या राजकारणाने वेगळे वळण घेतले. त्यानंतर सुमारे 40 दिवसांनंतर मंत्री मंडळाचा शपथविधी झाला. शपथविधी झालेल्या 18 आमदारांना बंगले मिळाले आहेत. मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 'देवगिरी' बंगला सोडावा लागणार नाही. त्यांनी देवेंद्र फडणवीसांना तशी पत्र पाठवून विनंती केली होती.

महाराष्ट्राच्या राजकारणाने वेगळे वळण घेतले. त्यानंतर सुमारे 40 दिवसांनंतर मंत्री मंडळाचा शपथविधी झाला. शपथविधी झालेल्या 18 आमदारांना बंगले मिळाले आहेत. मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘देवगिरी’ बंगला सोडावा लागणार नाही. त्यांनी देवेंद्र फडणवीसांना तशी पत्र पाठवून विनंती केली होती. त्यानंतर फडणवीसांनी मोठया मनाने विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना ‘देवगिरी’ मध्ये राहण्यास सांगितले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे मित्र प्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळे दवेंद्र फडणवीसांनी ‘ देवगिरी’ बंगल्याच्या चाव्या अजित पवारांकडेच ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली
आहे.

उपमुख्यमंत्र्यांसाठी असलेला ‘देवगिरी’ बंगला हा अजित पवारांकडे कायम आहे. सत्ता गेल्या नंतर मंत्र्यांना बंगले सोडावे लागतात. मात्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मात्र त्यांचा बंगला सोडावा लागणार नाही. मलबार ह‍िल येथी ‘देवगिरी’ हा बंगला अजित पवार यांना देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. अजित पवार यांनी ‘देवगिरी’ बंगला कायम राहावा, यासाठी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती. त्यानंतर सरकारने ‘देवगिरी’ बंगला हा अजित पवार यांच्याकडेच राहावा यासाठी परिपत्रक काढले. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ नंतर ‘देवगिरी’ हा बंगला भव्य मानला जातो. आता उपमुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना मनाचा मोठेपणा दाखवत हा बंगला अजित पवार यांच्याकडे ठेवला आहे.

अजित पवार गेल्या 16 वर्षाहून अध‍िक काळ या बंगल्यात राहत आहेत. 1999 ते 2014 या काळात अजित पवार हे देवगिरी बंगल्यावर राहत होते. त्यानंतर 2014 ला भाजपची सत्ता आली. त्यानंतर हा बंगला सुधीर मुनगंटीवार यांना मिळाला होता. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुन्हा हा बंगला अजित पवार यांना मिळाला होता. आता विरोधी पक्ष नेता पदावर असतांना देखील त्यांना हा बंगाला राहण्यासाठी मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

Jayant Patil : जयंत पाटील यांनी व‍िधानसभा अध्यक्षांवरच डागली तोफ !

Ashtavinayak Darshan: अष्टविनायक दर्शन – पहिला ‘गणपती’ कऱ्हेच्या तीरावरचा ‘मोरेश्वर’

The path of fire :’अग्न‍िपथ’ योजनेबद्दल जनजागृती करणाऱ्या ‘भारत के अग्निवीर’ चित्रपटाचा मुहूर्त राज्यपालांच्या हस्ते

नव्या मंत्र्यांचे नवे बंगले
शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री झालेल्या 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्र्यांचे खातेवाटप देखील झाले. या मंत्र्यांच्या बंगल्यांचे खाते वाटप झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना ‘रॉयलस्टोन’ बंगला, तर अब्दुल सत्तार यांना ‘पन्हाळा’ बंगला मिळाला आहे. तर मुनगंटीवार यांना ‘पर्णकुटी’ बंगला मिळाला आहे. उदय सामंत यांना ‘मुक्तगिरी’ बंगला मिळाला आहे.

तर संजय राठोड यांना ‘शिवनेरी’ बंगला मिळाला. तर चंद्रकांत पाटील यांना ‘सिंहगड’, विजयकुमार गाव‍ित यांना ‘चित्रकुट’ गिरीश महाजन यांना ‘सेवासदन’ तर गुलाबराव पाटील यांना ‘जेतवन’ तर सुरेश खाडे यांना ‘ज्ञानेश्वरी’ तसेच संदिपान भुमरे यांनी ‘रत्नसिंधु’ तर उदया सामंत यांना ‘मुक्तगिरी’ बंगला मिळाला आहे. रविंद्र चव्हाण यांना अ-६ ‘ रायगड’ अब्दुल सत्तार यांना ब-७ ‘पन्हाळगड’, दीपक केसरकर यांना ‘रामटेक’, तर अतुल सावे यांना अ-३ ‘शिवगड’, शंभूराज देसाई यांना ब-4 ‘पावनगड’, मंगल प्रभात लोढा यांना ब-5 ‘ विजयदुर्ग’, हा बंगाला मिळाला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी