29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयमंत्रिमंडळात एकही महिला नसणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव; अजित पवारांची खंत

मंत्रिमंडळात एकही महिला नसणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव; अजित पवारांची खंत

आज देखील ”स्त्री पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात वर्चस्व गाजवत आहे” हे किती विरोधाभासाने छाती ठोकून सांगितले जाते. मात्र आजही एका स्त्रीला तिची योग्यता, कार्यकुशलता सिद्ध करण्यासाठी पुरूषासोबत तुलनात्मक दृष्टीने बघितले जाते. देश स्वतंत्र झाला. पुरूषांसोबतच स्त्रीयांनाही स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला. परंतु तो अधिकार केवळ नावापुरताच असल्याचे चित्र आजही आपल्याला सहज दिसुन येते. आज महिला दिनानिमित्त शुभेच्छा देत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्त्रियांकरीता एक खंत व्यक्त केली आहे.

अजित पवार म्हणाले, एवढा मोठा आपला महाराष्ट्र आणि जागतिक महिला दिनाच्या दिवशी एकही महिला मंत्रिमंडळात नसणं हे दुर्दैव आहे. ते कमीपणाचं वाटतं. महाराष्ट्राच्या सरकारला ते शोभत नाही. मी अनेक वेळा जाहीर सभाच्यांवेळी, मीडियाच्यासमोर या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सभागृहासमोर देखील हा मुद्दा उपस्थित केला आहे. पण काय अडचण आहे हे मला कळायला मार्ग नाही. ही गोष्ट आम्हाला आणि तमाम महिला वर्गाला देखील पटत नाही, अशी खंत अजित पवार यांनी आज महिला दिननिमित्त माध्यमांसमोर व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा : 

महिला दिन विशेष : स्त्रिया ‘बोलत्या’ व्हायला लागल्या तेव्हा…

अजित पवार किस झाड की पत्ती; पवार घराणं राजकारणातून उखडून टाकणार!

GITA GPT: जीवनातील समस्यांवर भगवद्गीतेचा AI उपाय?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी