राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टीची कार्यकारिणीची बैठक आज मुंबईतील गरवारे हॉल येथे पक्षाचेराष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री ना. छगन भुजबळ यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, फ्रंटल सेलचे प्रमुख, आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. उपमुख्यमंत्रीतथा राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजितदादा पवार यांनी बैठकीस संबोधित केले(Ajit Pawar said, Sunil Tingre will also be investigated and action will be taken). अजित पवारांनी सध्या राज्यभरात घडत असलेल्याघटनांवर भाष्य करत सरकारत्याविषयी भूमिका घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे. नुकताचकाही भागांमध्ये वादळी वा-यासह पाऊस झालेला असून जे काही त्यामुळे आर्थिक हानीझाली असेल ती सरकार भरून काढेन असे ते म्हणाले. डॉंबिवली ब्लास्ट विषयी सांगतानातेथील जखमींवर उपचार केले जात असून मृतकांच्या नातेवाईकांना मदत निधी सरकारकडूनपुरवला जाईल असे त्यांनी सांगितले. शिवाय सध्या ज्या प्रकरणाक़डे सर्वांचे लक्षआहे ते म्हणजे पुणे अग्रवाल अपघात प्रकरण. यातील दोषींना शिक्षा केली जाणार असूनत्यांना मदत करणा-या सुनिल टिंगरेंवरही कारवाई केली जाईल असे अजित पवार पत्रकारपरिषदेत म्हणाले. निवडणूक हीकार्यकर्त्यांची परीक्षा असते. निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये तसचंपराभावाने खचूनही जाऊ नये. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्याला जपलं गेलेपाहिजे असं म्हणत अजितदादांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोधैर्यवाढवले. तसेच आता विधानसभा निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत. त्यावर लक्ष्यकेंद्रीत करून त्यानुसार पक्ष संघटनेची बांधणी करायची असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले, सुनील टिंगरे यांचीही चौकशी होणार, कारवाई सुद्धा करू
अजित पवारांनी सध्या राज्यभरात घडत असलेल्याघटनांवर भाष्य करत सरकारत्याविषयी भूमिका घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे. नुकताचकाही भागांमध्ये वादळी वा-यासह पाऊस झालेला असून जे काही त्यामुळे आर्थिक हानीझाली असेल ती सरकार भरून काढेन असे ते म्हणाले.