32 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
HomeराजकीयAjit Pawar : '...तो पर्यंत पक्ष संपत नसतो,' अजित पवार भडकले

Ajit Pawar : ‘…तो पर्यंत पक्ष संपत नसतो,’ अजित पवार भडकले

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका पदाधिकाऱ्याने आपल्या जिल्ह्यात राष्ट्रवादी कमकुवत होत असल्याचे म्हणत पार्थ पवारांकडे या जिल्ह्याची जबाबदारी द्यावी अशी मागणीच अजित पवार यांच्याकडे केली होती, परंतु या मागणीनंतर झाले उलटेच अजित पवारांनी त्या कार्यकर्त्यास चांगलेच झापले.

राज्यात सत्तांतर होऊन नवे सरकार आले तरी सत्ताधाऱ्यांऐवजी विरोधकांची चर्चा अधिक ऐकायला मिळते. यामध्ये विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांचा नंबर पहिला लागतो कारण त्यांचा रोखठोक स्वभाव भल्याभल्यांची भंबेरी उडवल्याशिवाय राहत नाही. एखादी गोष्ट आवडली किंवा नावडली ते त्यावर स्पष्टच बोलणं पर्यायाने पसंत करतात, कोणतीच भीडभाड न ठेवता शब्दांनीच समोरच्याला ते चोपून काढत असतात, त्यामुळे अनेकांना त्यांच्या या स्वभावाचे कौतुक वाटते. दरम्यान, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून यावेळी अजित पवारांनी राष्ट्रवादी काॅंग्रसच्या पदाधिकाऱ्यालाच चांगले झापल्याचे पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद जिल्ह्यातील एका पदाधिकाऱ्याने आपल्या जिल्ह्यात राष्ट्रवादी कमकुवत होत असल्याचे म्हणत पार्थ पवारांकडे या जिल्ह्याची जबाबदारी द्यावी अशी मागणीच अजित पवार यांच्याकडे केली होती, परंतु या मागणीनंतर झाले उलटेच अजित पवारांनी त्या कार्यकर्त्यास चांगलेच झापले. यावेळी बोलताना पवार म्हणाले, ‘जोपर्यंत पक्षाचा एक कार्यकर्ता आहे, तोपर्यंत पक्ष संपत नसतो,’ असे म्हणून कार्यकर्त्याची ही मागणी त्यांनी सपशेल धुडकावून लावली आहे.

हे सुद्धा वाचा…

Gandhi Jayanti 2022 : ‘गांधीजींसारखा बहुधा दुसरं कोणी होणे नाही’, राज ठाकरेंची विशेष पोस्ट

Mumbai News : चेंबूर हत्याकांड प्रकरणाची सत्ताधाऱ्यांकडून दखल

Chandrakant Khaire : ‘ठाकरे परिवाराच्या विरोधात बोलाल, तर याद राखा’

शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी आपल्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कमी होणारे महत्त्व लक्षात घेत या विषयाकडे गांभीर्याने लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी थेट अजित पवार यांना पर्याय सुचवत म्हणाले, उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी कमकुवत झाली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्याकडे उस्मानाबाद जिल्ह्याचे नेतृत्व द्यावं असे म्हणून त्यांनी एका नव्या नेतृत्वाची मागणी केली, मात्र त्यावर पवार यांनी अशी मागणी केल्यामुळे कार्यकर्त्याचीच कानउघडणी केली आहे.

पार्थ पवार हे अजित पवार यांचे पुत्र, त्यांनी लढवलेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्याकडून त्यांना दारुण परावभ सहन करावा लागला होता. या अपयशानंतर पार्थ पवार राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये किंवा सोशल मीडियावर थोडे फार दिसले असले तरीही राजकारणात ते सध्या सक्रीय नाहीत त्यामुळे आगामी काळात पार्थ पवार यांच्या अंगावर मोठी जबाबदारी देणार का, अजित पवारांप्रमाणे ते सुद्धा राजकीय वर्तुळात गाजवतील का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी