33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयअजित पवारांच्या गोपनीय दौऱ्याची चर्चा; सत्तासंघर्षाच्या निकालावर "नो कॉमेंट्स"

अजित पवारांच्या गोपनीय दौऱ्याची चर्चा; सत्तासंघर्षाच्या निकालावर “नो कॉमेंट्स”

राज्यातील खूप मोठा सत्ता संघर्षाचा फैसला होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे पूर्वनियोजित दिंडोरी तालुक्यात खाजगी दौऱ्यावर असून त्यांनी दोन मद्य प्रकल्पाला भेट दिली आहे. अत्यंत गोपनीयता पाळत अजित पवार यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. सदर ठिकाणी अजित पवार यांनी पत्रकारांचा ससेमिरा टाळत कंपनीच्या मागील गेटने बाहेर पडत नाशिक गाठले. अजित पवार यांच्या गोपनीय दौऱ्याची मोठी चर्चा परिसरात रंगली होती.

काल राज्यात मोठी घडामोड सुरू असताना आजित पवारांनी सकाळी लवकर नाशिक दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुगी येथील परनार्ड रिकार्ड या मद्य बनवणाऱ्या कंपनीला त्यांनी भेट देत तेथील डिस्टिलरीची पाहणी केली. तर दहाच्या सुमारास परमोरी येथील डियाजिओ (मॅक्डोवेल) कंपनीला भेट देत मद्य प्रकल्पाची पाहणी केली. या दौऱ्यात कोणत्याही राजकीय व्यक्तीचा सहभाग नव्हता. अत्यंत गोपनीयता पाळत अजित पवार यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला होता.

Nashik : अजित पवारांची दिंडोरीला गुपचूप भेट, मद्य कंपन्यांच्या डिस्टिलरीची पाहणी | पुढारी

एकीकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत प्रलंबित असलेला निकाल अखेर सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी दिला. यानंतर उद्धव ठाकरे आणि फडणवीस-शिंदे यांनी एकमेकांवर शाब्दिक वार केले, शरद पवारांनीही न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. असं असतांना विरोधी पक्षनेचे अजित पवार हे काय बोलतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र याबाबत प्रतिक्रीया देण्यास अजित पवारांनी टाळले.

कालच्या सर्व घडामोडीनंतर नाशिक येथून अजित पवार यांचे पुणे विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी अजित पवार यांना राज्यातील सत्तासंघर्षांबाबत विचारले असता ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रत जोपर्यंत वाचण्यास मिळत नाही. तोपर्यंत मी बोलणार नाही. तसेच मी लातूरमध्ये काल जी भूमिका मांडली. त्याप्रमाणेच घडले आहे. असं म्हणत अजित पवार गाडीत बसत असताना नो कॉमेंट्स म्हणाले आणि गाडी थोडी पुढे जातच मी दिल्लीला गेलो नाही, एवढच सांगा असे अजित पवार अस म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

हे सुद्धा वाचा :

निर्लज्जासारखं हसताय…जनता धडा शिकवेल; सुप्रीम कोर्टाच्या ज्येष्ठ वकिलांची संतप्त प्रतिक्रिया

शिंदे सरकारवर अद्यापही 16 आमदारांच्या अपात्रतेची टांगती तलवार; निर्णय अध्यक्ष महोदयांकडे!

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर खापर फोडणे ही कोर्टाने शोधलेली पळवाट !

Ajit Pawar, NCP, Ajit Pawar Visit to Nashik Liquor project; No Comments on Maharashtra Satta Sangharsh

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी