34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयअजित पवार यांची पहिली प्रतिक्रीया; शरद पवारांच्या निर्णयावर काय म्हणाले ?

अजित पवार यांची पहिली प्रतिक्रीया; शरद पवारांच्या निर्णयावर काय म्हणाले ?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत पक्षाध्यक्षपदी कायम राहणार असल्याचे सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील पवारांच्या या निर्णयाचे करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक कुटुंब आहे, आता आम्ही पून्हा नव्या जोमाने कामाला लागलो आहोत असे त्यांनी म्हटले आहे.

2 मे रोजीच्या कार्यक्रमात शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांनी निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली होती. त्यावेळी एकटे अजित पवार त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाच्या समर्थनात असल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे अजित पवार यांच्याबद्द्ल माध्यमांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु होत्या. आज देखील शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला अजित पवार उपस्थित नसल्याचे पत्रकारांनी विचारल्यानंतर शरद पवारांनी आपल्या खास शैलीत उत्तर देत अजित पवार यांना त्या निर्णयाबद्दल माहिती होते, असे सांगितले. शिवाय पत्रकार परिषदेला सर्वांनीच उपस्थित रहावे असे काही नाही असे देखील ते म्हणाले.


दरम्यान पत्रकार परिषदेनंतर अजित पवार यांनी शरद पवारांच्या पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. शरद पवार यांचा निर्णय माझ्यासह पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा असल्याचे सांगत महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकीला बळ देणारा असल्याचे देखील म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवार यांचा निवृत्तीचा निर्णय मागे; पक्षाध्यक्षपदी कायम राहणार

नरेंद्र मोदींचा कर्नाटक प्रचारात ‘द केरळ स्टोरी’ च्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर घणाघात

गोपीचंद पडळकरांचे ट्विट; नाव न घेता शरद पवारांवर साधला निशाना

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक कुटुंब आहे, शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष राज्यात आणि देशात उज्ज्वल यश संपादन करेल असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच शरद पवार यांचे वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन येणाऱ्या काळात सर्वांनी अधिक जबाबदारी उचलावी, आता एकजुटीने अधिक जोमाने काम करुन शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष अधिक मजबूत करावा असे देखील आवाहन त्यांनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी