27 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरराजकीयकाय ते मुख्यमंत्री.. काय ते उपमुख्यमंत्री..सगळं ओक्के मध्ये नाहीये, आंबादास दानवेंचा हल्लाबोल

काय ते मुख्यमंत्री.. काय ते उपमुख्यमंत्री..सगळं ओक्के मध्ये नाहीये, आंबादास दानवेंचा हल्लाबोल

टीम लय भारी

औरंगाबाद : राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराला काही मुहुर्त मिळेना त्यामुळे राजकीय वर्तुळातून, सर्वसामान्यांतून मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार असा सवाल पुढे येऊ लागला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली नसल्याने विस्ताराचा कार्यक्रम अजूनही रखडलेला असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यावरून राजकीय वर्तूळातून टिका सुरू झाली आहे. यावेळी आंबादास दानवेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला असून ‘काय ते मुख्यमंत्री.. काय ते उपमुख्यमंत्री..सगळं ओक्के मध्ये नाहीये’ म्हणून शिंदे – फडणवीसांवर टीका केली आहे.

औरंगाबाद – जालना स्थानिक स्वराज्य मतदार संघातील शिवसेना प्रवक्ता आंबादास दानवे यांनी मंत्रिमंडळ स्थापना होत नसल्यामुळे सोशल मिडीयावर राग व्यक्त केला आहे. ट्वीटमध्ये दानवे लिहतात, “मंत्रिमंडळ बनवणार..पण तारीख नाही सांगणार! काय ते मुख्यमंत्री..काय ते उपमुख्यमंत्री..काय ते सरकार.. सगळं ओक्के मध्ये नाहीये..!” असे म्हणून त्यांनी नव्या सरकारला सूनावले आहे.

राज्यात काही ठिकाणी पूर परिस्थितीमुळे परिस्थिती अवघड बनली आहे, परंतु खातेवाटपच झालं नसल्यामुळे दाद नेमकी कोणाकडे मागावी असा संभ्रम निर्माण झाला आहे, शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात आत्महत्या करू लागले आहेत. या संपुर्ण पार्श्वभूमीवर विरोधक चिडले असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून राज्य सरकारला धारेवर धरत आहेत.

हे सुद्धा वाचा…

VIDEO : बिग बॉस मराठीचे ४ थे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सावध राहा… खासदार नवनीत राणा यांना आले धोक्याची सूचना देणारे पत्र

एफआरपी थकीत असल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे व निराधार, एम. डी. राजेंद्र जंगम यांचे स्पष्टीकरण

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!