31 C
Mumbai
Saturday, February 4, 2023
घरराजकीयआपण भारत-पाकिस्तान सीमेवर राहतो का? कर्नाटकमुद्यावरून अंबादास दानवे यांचा सवाल

आपण भारत-पाकिस्तान सीमेवर राहतो का? कर्नाटकमुद्यावरून अंबादास दानवे यांचा सवाल

आज महाराष्ट्र बेळगाव एकीकरण समितीने आयोजित मोर्च्यात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेश बंदी केल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात आज उपस्थित केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावाद गेल्या ६१ वर्षापासून प्रलंबित आहे. कर्नाटक सरकारकडून सतत दुटप्पी भूमिकेचा अवलंब केला जात आहे. एकप्रकारे महाराष्ट्र राज्यातील लोकप्रतिनिधींना अडवलं जातंय हे म्हणजे आपण भारत-पाकिस्तान सीमेवर राहतो का असा प्रश्न पडल्याचे दानवे (Ambadas Danve) म्हणाले. (Maharashtra-Karnataka border dispute)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करूनही कर्नाटक सरकार दुटप्पी भूमिका अवलंबत आहे. त्यामुळे आता मराठी बांधवांच्या संरक्षणासाठी सरकारने खंबीर भूमिका घेतली पाहिजे, कर्नाटकला ‘ईट का जवाब पत्थर से’ देण्याची गरज आहे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केली. महाराष्ट्राच्या जनतेने, विधिमंडळ व सरकारने यासाठी एकत्र आलं पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री व तेथील नेते ज्याप्रमाणे एकत्र येऊन आक्रमक भूमिका मांडतात त्याप्रमाणे सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे अशी मागणी दानवे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

देशाच्या गृहमंत्र्यांनी मध्यस्थी करुनही कर्नाटकच्या कुरापती सुरूच; अजित पवार विधानसभेत गरजले

‘शाई फेकणाऱ्यावर गुन्हा, मग महापुरुषांचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर गुन्हा का नाही’

राज्यपाल कोश्यारींनी माजी पंतप्रधानांच्या पुतळा अनावरणाचे निमंत्रण नाकारले; अशोक चव्हाण यांचा आरोप

अंबादास दानवे म्हणाले, बेळगाव कर्नाटक सीमावादातील ८७५ गावांचा प्रश्न हा आजचा नाही, तरी जत, सोलापूर, अक्कलकोट मध्ये कर्नाटक सरकार सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय, यामुळे तेथील मराठी बांधवांमध्ये मोठया प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न सध्या दोन्ही राज्यात चांगलाच पेटला आहे. मध्यंतरी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकच्या सीमाभागात येऊ नये असे म्हटले होते. तसेच महाराष्ट्रातील काही गावांवर देखील त्यांनी हक्क सांगितला होता. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी देखील कर्नाटक सीमाभागातील आपला दौरा रद्द केला होता.यावरुन राज्यातील विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चा करुन मध्यस्थी केली होती. मात्र आज आज महाराष्ट्र बेळगाव एकीकरण समितीने आयोजित मोर्च्यात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेश बंदी केल्याने हा प्रश्न पुन्हा पेटला. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरुन आज विरोधी पक्षांनी सभागृहात सरकारला धारेवर धरले.

 

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!