25 C
Mumbai
Sunday, September 3, 2023
घरराजकीयमराठा आंदोलन लाठीचार्ज प्रकरणी दोषींवर कारवाई करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन :...

मराठा आंदोलन लाठीचार्ज प्रकरणी दोषींवर कारवाई करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन : अंबादास दानवे

जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज प्रकरणी सर्वस्वी सरकार जबाबदार असून पोलीस अधीक्षक यांच्यावर सरकारने निलंबनाची कारवाई केली पाहिजे. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करा, आणि आंदोलकांना न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा शिवसेना पद्धतीने राज्य सरकारला धडा शिकवू असा इशारा असा इशारा शनिवारी (दि.2) रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला दिला.

दानवे म्हणाल, मराठा समाजासोबत राज्य सरकार बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी या उक्तीप्रमाणे वागत आहेत. मराठा समाजाच्या आंदोलनाला राज्य सरकार दडपू पाहत आहे. मात्र मराठा समाजाचा आक्रोश दडपणार नसून तो अजून ताकदीने उभा राहील असा इशारा दानवे यांनी दिला.

अंतरवाली सराटा गावात सुरू असलेल्या आंदोलनातील माता भगिनींवर पोलिसांनी लाठी चार्ज केला आहे. दीड वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची याचिका खारीज केली. या दीड वर्षात राज्य सरकारने मराठा आरक्षण प्रकरणी काय निर्णय घेतला असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे.

हे सुद्धा वाचा 

एक फुल, दोन हाफ…. कुणाला म्हणाले उद्धव ठाकरे!
Happy Birthday इशांत शर्मा | क्रिकेटशिवाय इशांतला आवडतात ह्या गोष्टी..
संरपंचाने पेटवली स्वत:ची कार; मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा नोंदवला निषेध
दानवे म्हणाले, फक्त शासनाच्या सह्याद्री निवासस्थानी मराठा आरक्षण संदर्भात कोणताही तोडगा निघणार नाही अशा बैठका घेण्यात आल्या ज्यातून या प्रश्न प्रकरणी काही निर्णायक गोष्टी साध्य झाल्या नाहीत, असे दानवे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रतिनिधित्व करत असून त्यांनी शिफारस करून मोदी सरकाराला संसदेत ठराव आणून मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात असलेल्या ५०% अटीची मर्यादा शिथिल करावी, अशी मागणी दानवे यांनी यावेळी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी