24 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराजकीयबुलेट ट्रेनसाठी 6 हजार कोटी खर्चणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांकडे बघायला वेळ नाही- अंबादास...

बुलेट ट्रेनसाठी 6 हजार कोटी खर्चणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांकडे बघायला वेळ नाही- अंबादास दानवेंचा आरोप

बुलेट ट्रेनसाठी 6 हजार कोटी खर्च करणाऱ्या सरकारला टोमॅटो, कांदा उत्पादकाकडे बघायला वेळ नाही, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केली. 5 लाखांची औषधे मोफत देण्याची घोषणा सरकारने केली. पण एक रुपयांचे औषध मिळाले नाही. आपला दवाखाना सुरू केले हे दवाखाने आपले नाहीत, राज्यात 6 हजार 700 बालके हॉस्पिटल मध्ये दाखल असताना मृत्यू झाले. एकीकडे बेटी बचाओ अशी घोषणा करणाऱ्या सरकारच्या काळात 70 मुली बेपत्ता होतात असेही दानवे यांनी सांगितले.

राज्यात पापी लोकांचे सरकार असल्याने निसर्ग कोपत आहे. अर्धेराज्य दुष्काळात आहे. 50 टक्क्यापेक्षा जास्त आनेवारी आहे. एक रुपयात पीकविमा ही योजना सरकारने आणली. पण विमा कंपन्यांची  खळगी भरण्यासाठीचा  डाव  सरकारने आखला. राज्यात पावसाचा खंड 25 दिवसांचा आहे. सव्वा कोटी शेतकऱ्यांचा सरकारने पीक विमा भरला आहे. मग शेतकऱ्यांना सरकार नुकसान भरपाई का देत नाही, असा सवाल दानवे यांनी दिला.

राज्यातील कांदा उत्पादकांचे 40 कोटी येणे आहे. यासाठी 15 ऑगस्टचे आश्वासन सरकारने दिले होते. पण ही तारीख उलटून गेली तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. मागच्या वर्षी 12 हजार भाव देण्यात आला होता. यंदा 6 हजारावर आला आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव देऊ अशी घोषणा करणारे सरकार  बुलेट ट्रेनसाठी 6 हजार कोटी खर्च करते पण  सरकारला शेतकऱ्यांकडे बघायला वेळ नाही, असेही त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे सरकार असताना इदहव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी वाटले. या सरकारने 34 हजार कोटी शेतकऱ्यांना वाटू असे सांगितले. प्रत्यक्षात 18 हजार कोटीच या सरकारने क्षेत्रकयांना दिले. असेही दानवे म्हणाले. राज्याची आरोग्य यंत्रणा बिघडली आहे. पूर्वी दवाखान्यात औषधे खरेदी करण्यासाठी 108 कोटीची ऑर्डर दिली जायची. पण मिळतात किती ते फक्त 50 कोटी. दोन महिने राज्यातील सरकारी दवाखान्यात औषधे नाहीत. पूर्वी हाफकिनकडून औषधे खरेदी केली जायची. नंतर औषध खरेदी प्राधिकरण तयार करण्यात आले. या प्राधिकरणाने एक रुपयाचे औषध खरेदी करण्यात आले नाही.असेही दानवे म्हणाले.

हे सुद्धा वाचा  

सुषमा अंधारेंचा रोष कुणावर? म्हणाल्या धमकी द्यायचे काम नाही

फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला, असे का म्हणाल्या सुषमा अंधारे…

गोपीचंद पडळकरांच्या सांगली जिल्ह्यात धनगर आरक्षणावरून युवकाची आत्महत्या

वसंतराव नाईक, वसंतराव पाटील, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचा हा महाराष्ट्र आहे. पण या राज्याचे दिवस बदलू लागले आहेत. जे राज्य पूर्वी होते ते गेले. आता फक्त  सरकार आहे. जनतेचे प्रश्न आहे तिथेच आहेत.  5 लाखांची औषधे मोफत देण्याची घोषणा सरकारने केली. पण एक रुपयांचे औषध मिळाले नाही. आपला दवाखाना सुरू केले हे दवाखाने आपले नाहीत, राज्यात 6 हजार 700 बालके हॉस्पिटलमध्ये दाखल असताना मृत्यू झाले. एकीकडे बेटी बचाओ अशी घोषणा करणाऱ्या सरकारच्या काळात 70 मुली बेपत्ता होतात असेही दानवे यांनी सांगितले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी