29 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराजकीयआधी मध्य प्रदेश आणि आता तेलंगणा; निवडणुकीच्या तोंडावर राम मंदीराची ऑफर सुरूच

आधी मध्य प्रदेश आणि आता तेलंगणा; निवडणुकीच्या तोंडावर राम मंदीराची ऑफर सुरूच

राज्यात निवडणुकांना सुरुवात होण्याआधी निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीला वर्ष असून भाजपने आतापासूनच तयारी करायला सुरुवात केली आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आपली ताकद लावून मत मिळवत असल्याचे आतापर्यंत आपण पाहिले आहे. मात्र आता भाजपने (BJP) प्रचार करण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवली आहे. मध्य प्रदेशात विधानसभेची निवडणूक होती तेव्हा भाजप नेते अमित शहांनी (Amit shah) ‘भाजपची सत्ता आणा मग राम मंदिराचे दर्शन घडवू’, असे आश्वासन दिले होते. यानंतर आता अमित शहांनी तेलंगणा निवडणुकीतही (Telanagana Legislative Assembly Election) भाजपला विजयी करा आणि राम मंदिराचे दर्शन करण्यासाठी सरकार खर्च करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

तेलंगणाच्या गडवाल येथे प्रचारासाठी अमित शहा गेले असता त्यांनी काँग्रेसला धारेवर धरले आहे. गेल्या सात दशकांपासून राम मंदिराचे काम बंद होते. यासाठी काँग्रेसने आडकाठी आणली होती. भाजपने सतत राम मंदिराच्या मुद्द्यावर काँग्रेसला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे याचा परिणाम हा विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजन केले आणि येत्या २२ जानेवारीला त्याची प्राणप्रतिष्ठा होणार असून तेलंगणातील मतदारांनी भाजपला मत देऊन भाजपचे सरकार तेलंगणात निवडून आणून द्यावे, इतर सर्व खर्च सरकार देईल, असे आश्वासन अमित शहांनी दिले आहे.

हे ही वाचा

नामदेवराव जाधवांच्या तोंडाला फासलं काळं; पवार कार्यकर्ते आक्रमक

वर्ल्डकप फायनलपूर्वी शमीच्या पत्नीचे वक्तव्य चर्चेत

अमित शहानंतर उदय सामंतांची अयोध्यावारी ऑफर

आधी मध्य प्रदेश आणि आता तेलंगणा

राज्याचे राजकारण हे देवांवर केले जात असल्याचे दावे आता महाराष्ट्रातून विरोधी पक्षातून होत आहेत. आधी मध्यप्रदेशात भाजपचे सरकार आणा आणि मग अयोध्यावारी करण्यात येणार असून सर्व खर्च सरकार करेल. तर तेलंगणात निवडणुकीच्या उद्देशाने भाजप मतदान करून सरकारला मत द्या असे आवाहन करत असून याबरोबर सरकार एकही रुपये खर्च न करता राम मंदिरात दर्शनाला घेऊन जाईल, असे आश्वासन दिले जात आहे. तर महाराष्ट्रातही उद्योग मंत्री उदय सामंतांनीही मतदारसंघातील मतदारांना राम मंदिराची यात्रा करायला घेऊन जाणार असल्याचे वक्तव्य केलं. तर यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील महाराष्ट्रातील जनतेने निवडून दिल्यानंतर अयोध्यावारीसाठी एक-एक करत दर्शनाला घेऊन जातील, असे वक्तव्य सामंतांनी केलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी