27 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरराजकीय'तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही हे परत एकदा सिद्ध', मिटकरींचा मुख्यमंत्री शिंदेंना...

‘तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही हे परत एकदा सिद्ध’, मिटकरींचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

टीम लय भारी

अकोला : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्याबाबत मनातील खदखद नुकतीच बोलून दाखवली, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विधानाची सारवासारव केली परंतु प्रसारमाध्यामांतून विरोधी पक्षातील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष करून त्यांच्या निर्णयावरच टीका करीत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी सुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर भाष्य करीत मुख्यमंत्री शिंदे यांना सणसणीत चपराक लगावली आहे.

अमोल मिटकरी यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला असून त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे विधान केले आहे. अमोल मिटकरी म्हणतात, “शिंदे साहेब चंद्रकांत पाटलांच्या मनातील खदखद समजून घ्या, त्यांच्या एकट्याच्या मनातील सल नाही अख्ख्या भाजपच्या मनातील ही सल आहे. तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही हे परत एकदा सिद्ध झालंय अजुनही सावध असा,” असे म्हणून मिटकरी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी सावधानतेचा इशाराच दिला आहे. शिवाय पोस्टमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांना टॅग केले आहे.

शिंदे गटाने शिवसेनेतून बंड करून बाहेर पडून भाजपशी हात मिळवणी केली खरी परंतु आतापर्यंत व्यक्त न केलेल्या भावना भाजपमधील लोक व्यक्त करून लागले आहेत. नाराजी उघडउघडपणे बोलून दाखवू लागले आहेत, त्यामुळे शिंदे गटासाठी ही धोक्याची घंटा म्हणायची का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा…

शिवसेनेचे हकालपट्टी सत्र सुरूच, पक्षविरोधी कारवाई केल्याने आणखी सात जणांवर कारवाई

क्रिकेटपटू कृणाल पांड्याला झाले पुत्ररत्न, ठेवले ‘हे’ नाव

संविधानाचं रक्षण करण्याची सर्वाधिक जबाबदारी युवांवर, रोहित पवारांचा तरुणांना सल्ला

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!