35 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeराजकीयअमोल मिटकरी म्हणतात... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संविधानाचा अपमान!

अमोल मिटकरी म्हणतात… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संविधानाचा अपमान!

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला, त्यावेळी त्यांनी कार्यालयात धार्मिक विधीचे आयोजन केल्याचे फोटो व्हायरल झाले आणि पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोपांचे खेळ सुरू झाले. याच धार्मिक विधीवर टीका करत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारताना कार्यालयात धार्मिक विधीचे आयोजन केले होते, यावर टीकास्त्र सोडत अमोल मिटकरी म्हणाले, शिंदे साहेब धार्मिक आहेच याबद्दल आमच्या मनात आदरच आहे, दुमत असण्याचे कारण नाही; मात्र पुजा आणि विधीचे अधिकार हे आपल्या घरातच असावेत अशाप्रकारे सेक्यूलर राष्ट्रात जर पुजा विधी मांडण्याचा थाट मुख्यमंत्र्यांकडून होत असेल तर निश्चितच ही गोष्ट अत्यंत निंदनिय आहे.

पुढे मिटकरी म्हणाले, महाराष्ट्र हे पुरोगामी राष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचे मंत्रालय किंवा विधानभवन असेल किंवा विधीमंडळाचे कामकाज असेल हे भारतीय संविधानावर चालतं. भारतीय संविधानाच्या ‘राईट टू रिलीजन’ नुसार कलम 25, 26, 27, 28 या कलमांत धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे; मात्र अशा ठिकाणी जिथे शासकीय कार्यालय आहेत तिथे कुठल्याच प्रकाराची धार्मिक पुजा विधी होता कामा नये हा संविधानाचा एकप्रकारे अपमान आहे, असे म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांच्या कृतीवर त्यांनी सवाल केला आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची पुजा त्यांच्या ऑफिसमध्ये केल्यानंतर या महाराष्ट्रात खरोखर लोकशाही जिवंत आहे का, याचे चिंतन यानिमित्ताने झाले पाहिजे कारण ही  गोष्ट लोकशाहीला मारक आहे. मी या गोष्टीचा तीव्र शब्दांच निषेध करतो, असे म्हणून अमोल मिटकरी यांनी सद्यस्थितीतील राजकीय वर्तुळात घसरत चाललेल्या संविधानिक मुल्यांकडे प्रकर्षाने लक्ष वेधले आहे.

हे सुद्धा वाचा…

मनसेच्या गजाजन काळेंनी संजय राऊतांना काढला चिमटा

ब्रेकिंग : हवामान खात्याचा मुंबईकरांना ‘रेड अलर्ट’, दुपारनंतर ‘मुसळधार’चा जोर वाढवणार

मोठी बातमी : एकनाथ शिंदे म्हणाले, OBC आरक्षण टिकवण्यासाठी माझे आणि फडणविसांचे मजबूत नियोजन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी