32 C
Mumbai
Saturday, May 13, 2023
घरराजकीयअमोल मिटकरी म्हणतात हनुमान चालीसा, हनुमान स्रोत झालं आता चला डोळ्याला पाणी...

अमोल मिटकरी म्हणतात हनुमान चालीसा, हनुमान स्रोत झालं आता चला डोळ्याला पाणी लावा…

टीम लय भारी

मुंबई:  इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद मेळाव्यात आमदार अमोल मिटकरी (Amol mitkari) यांनी राज ठाकरे यांच्या जोरदार टीका केली. यावेळी राज ठाकरे यांनी मशीदीवरील भोंगे हटविले नाही तर हनुमान चालीसा वाजवू असा इशारा दिला होता.मात्र मिटकरी यांनी हनुमान चालीसासोबत हनुमान स्रोत बोलून दाखवले आहे. या सभेत त्यांनी म्हटलं की तुम्ही आम्हाला धर्म शिकवू नका. Amol mitkari criticism raj thackeray

मंत्री जयंत पाटील यांच्या सांगण्यावरुन त्यांनी हनुमान स्रोत म्हणतं पुढे म्हटले की, चला डोळ्याला पाणी लावा हे म्हणताच भरसभेत एकच हशी पिकला. यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांची नक्कल करुन दाखवली.अमोल मिटकरी (Amol mitkari)  यांनी काव्यात्मक ओळींमधून भाजपला टोला लगावला आहे.

त्यांनी ट्विट केले आहे. मिटकरी म्हणतात, ते काहीही करू शकतात! ते हिंदू मुस्लिमांना आपसात लढवू शकतात! स्वतःच्या गाडीच्या काचा फोडून सहानुभूती मिळवु शकतात ते काहीही करू शकतात, कारण कोल्हापुरमधील पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय त्यामुळे ते काहीही करू शकतात. ते काहीही करु शकतात, ते चालीसापासुन इफ्तारपर्यंत सर्व काही करु शकतात, ते काहीही करू शकतात. असा काव्यात्मक ओळींमधून मिटकरी यांनी भाजपला टोला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा : 

महाराष्ट्र विकणं यांना चहा विकण्यासारखं वाटलं का -अमोल मिटकरी

Riot Was Avoided in Mumbai Due to Statement About ’12th Blast’ in 1993, Says NCP Chief Pawar

Dilip Walase Patil राष्ट्रवादीचा अजेंडा न बोलता गृहमंत्री म्हणून बोलले पाहिजे : Devendra Fadanvis

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी