32 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
HomeराजकीयAmol Mitkari : रवी राणा यांना नव्याने 'देवेंद्र चालीसा' वाचण्याची गरज, अमोल...

Amol Mitkari : रवी राणा यांना नव्याने ‘देवेंद्र चालीसा’ वाचण्याची गरज, अमोल मिटकरींचा टोला

मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून पक्षातील नेते जीवाचे रान करीत आपली स्वामीभक्ती सिद्ध करीत असतात, परंतु दरवेळी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळतेच असे नाही, असेच काहीसे भाजप नेते रवी राणा यांच्यासोबत झाले असून त्यांच्या हिंदुत्वाच्या पुढाकाराकडे भाजपने सपशेल दुर्लक्ष केले असून त्यांचे नाव मंत्रिमंडळाच्या विस्तारात घेतलेच नाही. या संपुर्ण परिस्थितीमध्ये रवी राणा स्वतःचे अस्तित्व हिंदुत्वाच्या बळावरच सांभाळणार की आणखी काही करणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. 

कायम हिंदुत्वाचा नारा देऊन हनुमान चाळीसासाठी आग्रही असणारे भाजप नेते रवी राणा यांना मंत्रीपदासाठी डावलण्यात  आले. त्यामुळे कायम भाजपची पाठराखण करणारे, हिंदुत्वाला अजेंडा बनवून काम करणाऱ्या राणांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. हाच मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी रवी राणा यांना मिश्कील टोला लगावला आहे. “देवेंद्र फडणवीस ठरवतील त्यांना मंत्री पद मिळतं याचा अर्थ त्यांना नव्याने ‘देवेंद्र चालीसा’ वाचण्याची गरज आहे” असे म्हणून मिटकरी यांनी रवी राणांवर सडकून टीका केली आहे. शिंदे – फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम घाईत पार पडला असला तरी ज्यांना कोणाला मंत्रीपद मिळालेले नाही त्यांच्यामध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत.

नव्या सरकारला धारेवर धरत अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये मिटकरी लिहितात, “हिंदुत्वासाठी जीवाचं रान करणारे रवी राणा ,हनुमान चालीसा खिशात घालुन फिरणारे रवी राणा, अखेर वैफल्यग्रस्त झालेत.देवेंद्र फडणवीस ठरवतील त्यांना मंत्री पद मिळतं याचा अर्थ त्यांना नव्याने”देवेंद्र चालीसा” वाचण्याची गरज आहे. रवीराणा यांना धर्म रक्षणार्थ मंत्रिपद मिळालेच पाहिजे,” असे म्हणून रवी राणा यांना अमोल मिटकरी यांनी डिवचले आहे.

हे सुद्धा वाचा

Comedian Raju Srivastav : लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक

Eye operation : अबब ! डोळ्यातून ऑपरेशन करून काढला चक्क चाकू !

U U Lalit : सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी ‘मराठमोळी’ व्यक्ती!

मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून पक्षातील नेते जीवाचे रान करीत आपली स्वामीभक्ती सिद्ध करीत असतात, परंतु दरवेळी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळतेच असे नाही, असेच काहीसे भाजप नेते रवी राणा यांच्यासोबत झाले असून त्यांच्या हिंदुत्वाच्या पुढाकाराकडे भाजपने सपशेल दुर्लक्ष केले असून त्यांचे नाव मंत्रिमंडळाच्या विस्तारात घेतलेच नाही. या संपुर्ण परिस्थितीमध्ये रवी राणा स्वतःचे अस्तित्व हिंदुत्वाच्या बळावरच सांभाळणार की आणखी काही करणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी