28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयअजून तरी माझे मानसिक संतुलन ढासळले नाही ,अमृता फडणवीस

अजून तरी माझे मानसिक संतुलन ढासळले नाही ,अमृता फडणवीस

टीम लय भारी

मुंबई:- भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्ही पुरोगामी संघटना आहेत. स्त्रियांचा आदर ठेवणे, ही संघाची प्राथमिकता आहे. मी संघ आणि भाजप दोन्ही संघटनाच्या जवळ आहे. पण मी अराजकीय आहे. परंतु, देशात स्त्रियांचा सर्वाधिक आदर कुठे होत असले तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होतो, हे मी खात्रीने सांगू शकते, असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले.

कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी महिलांविषयी नुकतेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यासाठी बंडातात्या कराडकर यांना अटकही करण्यात आली आहे. मात्र, बंडातात्या कराडकर यांना बोलविता धनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप आहे, अशी चर्च सुरु आहे. याविषयी अमृता फडणवीस यांना विचारले असता त्यांनी RSS ही स्त्रियांचा आदर करणारी संघटना असल्याचे म्हटले. त्या शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

हे सुद्धा वाचा

अमृता फडणवीसांच्या आवजाची जादू पुन्हा एकदा ऐकायला मिळणार, आगामी मराठी चित्रपटासाठी गायलं गाणं!

देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

अमृता फडणवीस-विद्या चव्हाण वादात देवेंद्र फडणवीसांची उडी,म्हणाले…

Amrita Fadnavis, wife of former Maharashtra CM, sings Hindi version of ‘Manike Mage Hithe’

यावेळी अमृता फडणवीस यांना बंडातात्या कराडकर यांनी महिला नेत्यांविषयी विधानाविषयी प्रतिक्रिया दीली त्या म्हणाल्या महिलांनी आपल्या देशात आधीच खूप भोगलेले आहे. यामुळे महिलांच्या खासगी आयुष्यावर टिप्पणी करू नये. हे चुकीचे वाटते. त्यापासून दूर रहावे. आपल्या देशात, महाराष्ट्रात हेच होते. कोणी काही बोलले की त्यावर आंदोलने होतात. परंतू आधीच बोलताना काळजी घ्यायला हवी, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली.

तसेच तुम्ही हे विसरून जा की मी देवेंद्र फडणवीस यांची बायको आहे, जेव्हा मी काही बोलते. मलाही रस्त्यांच्या खड्ड्यांचा किंवा अन्य गोष्टींचा त्रास होतो. मी सामान्य स्त्री म्हणून बाहेर पडते. या बायका बोलतात की माझे मानसिक संतुलन ढासळले आहे, तसे काही नाहीय. मुंबईत वाहतूक कोंडीमुळे ३ टक्के घटस्फोट होतात ते त्यांच्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीत. तुम्ही यावर बोलणार नसाल तर काय कराल, असेही अमृता यांनी त्यांच्यावरील टीकेवर उत्तर देताना म्हटले आहे.

अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट करुन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. यामध्ये अमृता यांनी संजय राऊत यांचा उल्लेख नॉटी नामर्द असा केला होता. याविषयी अमृता फडणवीस यांना विचारण्यात आले. त्यावर अमृता यांनी म्हटले की, त्यांनी लोकांनीच ही उपाधी दिली आहे. मध्यंतरी त्यांनी एक चुकीची पोस्ट टाकली तेव्हा एका महिला नेत्यानेही त्यांचा तसाच उल्लेख केला. पण नामर्द या शब्दाचा तंतोतंत अर्थ घेऊ नये. याचा अर्थ म्हणजे कोणतीही गोष्ट थेटपणे समोरुन न करता ते मागून करतात, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी