28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयबरं झालं ब्याद गेली ; भगतसिंग कोश्यारींच्या जाचातून अखेर महाराराष्ट्राची सुटका...

बरं झालं ब्याद गेली ; भगतसिंग कोश्यारींच्या जाचातून अखेर महाराराष्ट्राची सुटका…

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर आता रमेश बैस यांची वर्णी लागणार असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. त्यामध्ये भगतसिंग कोश्यारी यांचादेखील समावेश आहे. त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. उशिरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. तर शिवसेनेने आपल्या नेहमीच्या शैलीत या निर्णयावर तोंडसुख घेतले आहे. एकूणच राज्यपालांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्यानंतर विरोधकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांसारख्या वंदनीय व्यक्तींबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेपार्ह विधाने केल्यानंतर त्यांना राज्यपाल पदावरून हटविण्याची मागणी विरोधकांनी केली होती. कोश्यारी यांनी केलेल्या बेजबाबदार विधानांमुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्यानंतर अनेक ठिकाणी कोश्यारींच्या विरोधात आंदोलने करण्यात आली होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची कोंडी झाली होती. महाराष्ट्रातून कोश्यारी हटाव या मोहिमेला लोकांनीही पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे राजकीय दबाव वाढत चालला होता. या पार्श्वभूमीवर आपल्याला पदमुक्त करण्याची विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई दौऱ्यादरम्यान केली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ही मागणी मान्य झाल्याची बातमी समोर येत आहे. (Bhagat Singh Koshyari’s resignation accepted An atmosphere of joy among opponents)

महाराष्ट्राची सुटका झाली

Bhagat Singh Koshyari's resignation accepted

 

रमेश बैस यांनी घटनेनुसार काम करावे

Bhagat Singh Koshyari's resignation accepted

”देर आये दुरुस्त आये”

Bhagat Singh Koshyari's resignation accepted

“महाराष्ट्रातली घाण गेली”

Bhagat Singh Koshyari's resignation accepted

निवडणुकीच्या तोंडावर केलेली ही भाजपची खेळी

Bhagat Singh Koshyari's resignation accepted

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी