27 C
Mumbai
Tuesday, November 29, 2022
घरराजकीयAndheri East Bypoll Election : अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ऋतुजा लटकेंना सहा...

Andheri East Bypoll Election : अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ऋतुजा लटकेंना सहा उमेदवारांचे आव्हान; गुरुवारी होणार मतदान

बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Bypoll Election) गुरुवारी (ता. ३ नोव्हेंबर) मतदान होणार आहे. अनेक राजकीय वादांमुळे अंधेरी पोटनिवडणूक चर्चेत आली.

बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Bypoll Election) गुरुवारी (ता. 3 नोव्हेंबर) मतदान होणार आहे. अनेक राजकीय वादांमुळे अंधेरी पोटनिवडणूक चर्चेत आली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून विजयी झालेले रमेश लटके यांचे काही महिन्यांपूर्वी अचानक निधन झाले. त्यामुळे या जागेवर गुरुवारी निवडणूकल घेण्यात येत आहे. राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर पाहल्यांदाच मुंबईमध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. या आमदारकीच्या निवडणुकीसाठी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या पत्रानंतर मुरजी पटेल यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला होता.

मनसे अध्यक्ष यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण आपल्या राज्यात पोटनिवडणुकांमध्ये एखाद्याच्या घरी दुखावटा असेल तर उमेदवार उभा करू नये , ही आपली संस्कृती नाही दिलेला उमेदवार मागे घ्या, असे विनंतीपर पत्र लिहिले होते. त्यानंतर भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून देखील राज ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्राचा मान राखत आपला उमेदवार मागे घेतला. पण मुरजी पटेल यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या निर्णयानंतर अंधेरी पूर्व येथील पटेल यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले.

भाजपचे मुरजी पटेल यांनी जरी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या ऋतुजा लटके यांच्यासमोर इतर सहा उमेदवार उभे राहिले आहेत. यामध्ये चार अपक्ष, एक आपकी अपनी पार्टी (पीपल्स) आणि एक राईट टू रिकॉल पार्टी अशा सहा उमेदवारांचा समावेश आहे. परंतु असे असले तरी या निवडणुकीत ऋतुजा लटके यांचे पारडे जड आहे. दिवंगत रमेश लटके यांच्या त्या पत्नी असल्याने त्यांना मिळत असलेला पाठिंबा आणि जनतेमध्ये त्यांच्याविषयी असलेली सहानुभूती यांचा त्यांना विजयी होण्यासाठी निश्चितच फायदा होणार आहे.

हे सुद्धा वाचा

ShivSena : राज्यात पुन्हा शिवशक्ती-भीमशक्तीची गर्जना होणार?; प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरे एकत्र येणार?

Nitesh Rane : उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नाहीत लक्षात ठेवा, नितेश राणेंचा हल्लाबोल

Anandacha Shidha : आनंदाचा शिधा न मिळाल्याने ग्राहकांचा रेशन दुकानावर हल्ला

अनेक नाट्यमय वळणे या निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच पाहायला मिळाली. सुरुवातीला ऋतुजा लटके हे कार्यरत असलेल्या मुंबई महानगरपालिकेतील सेवेचा राजीनामा मंजूर न झाल्याने त्यांना उमेदवारी मिळते का ? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा मुम्बावाई उच्च न्यायालयात पोहोचला होता. ज्यामुळे त्या सर्वाधिक चर्चेत आल्या. त्यानंतर भाजपने त्यांच्याविरोधात मुरजी पटेल यांना दिलेली उमदेवार यामुळे तर सर्वाधिक गदारोळ माजला गेला. दरम्यान, आता अनेक राजकीय नाट्यानंतर गुरुवारी या निवडणुकीसाठीचे मतदान पार पडत आहे. मतदानाच्या काही दिवसांतच याचा निकाल देखील जाहीर करण्यात येणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!