28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरराजकीयMamata Banerjee : मला अटक करुन दाखवा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे भाजपला...

Mamata Banerjee : मला अटक करुन दाखवा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे भाजपला खुले आव्हान

पश्चिम बंगाल मधील ही प्रकरणे पाहता मी भाजपला आव्हान देते की, मला अटक करुन दाखवा. मला जेलमध्ये बंद केले जाऊ शकते. मात्र दाबू शकत नाहीत. मी जेलमध्ये सडेन मात्र मी लढेन.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील आणखी काही नेत्यांना अटक होण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि नेत्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काळा पैसा आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन भाजप सत्तेचा दुरूपयोग करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. देशात निवडून आलेले गैर भाजप सरकार पाडण्याचे षडयंत्र भाजप रचत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेला संबोध‍ित करतांना ते कोलकात येथे बोलत होते. भाजपने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले. आता त्यांनी प. बंगालकडे आपला मोर्चा वळवला आहे.

महाराष्ट्रामधील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर त्यांनी दिल्लीमधील आम आदमी पार्टीचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला. झारखंडमध्ये देखील त्यांनी सत्तापालट करण्याचा प्रयत्न केला. भाजपकडे सरकार कोसळवण्यासाठी इतका पैसा येतो कुठून ? बंगालमध्ये निवडून आलेले सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना अटक केली. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे मनोबल कमी करण्यासाठीच ईडी आणि सीबीआयची छापेमारी सुरु आहे.

त्या असेही म्हणाल्या की, आज अभिषेक बॅनर्जीने चांगले भाषण केले. त्यामुळे उद्या केंद्रीय तपास यंत्रणा लगेच त्यांच्या
घरी हजर झाल्या. अभ‍िषेक यांची पत्नी रुजिरा आणि दोन वर्षांचा मुलगा यांना चौकशीला बोलावले होते.‍ त्यांना अटक करुन भाजप निवडणूक ज‍िंकणार आहे का? यावेळी ममता बॅनर्जी यांनी शिक्षक नियुक्ती घोटळयामध्ये अटक केलेल्या शिक्षण मंत्री पार्थ चटर्जी बद्ल देखील बोलल्या. मला महित नाही की, पार्थ चटर्जीला का अटक केले. हे प्रकरण विचाराधीन आहे. तृणमूल काँग्रेसला भाजप आव्हान देत आहे. पश्चिम बंगाल मधील ही प्रकरणे पाहता मी भाजपला आव्हान देते की, मला अटक करुन दाखवा. मला जेलमध्ये बंद केले जाऊ शकते. मात्र दाबू शकत नाहीत. मी जेलमध्ये सडेन मात्र मी लढेन.

हे सुद्धा वाचा

Mohit Kamboj : विद्या चव्हाणांनी माझी बदनामी केली, मोहित कंभोज यांचा आरोप

Nitin Gadkari : नितीन गडकरींनी केले पुन्हा एकदा सूचक वक्तव्य

Ganpatichi Aarti : आरतीमधील चुकीच्या शब्दांच्या उच्चारामुळे आरतीचा भावार्थ बदलतो

तसेच ममता बॅनजींनी बिलकिस बानो यांचे समर्थन करण्यासाठी कोलकातामध्ये दोन दिवसांचे धरणे आंदोलन होणार असल्याचेही यावेळी सांगितले. याचे नेतृत्व दोन महिला मंत्री करणार आहेत. या प्रकरणात त्यांनी दोषींना पुन्हा जेलमध्ये पाठवण्याची मागणी केली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी