26 C
Mumbai
Sunday, December 4, 2022
घरराजकीयGajrat Assembly Elections : अरविंद केजरीवालांनी हिंदुत्त्वाची विचारधारा अंगिकारली आहे; ओवेसींची टीका

Gajrat Assembly Elections : अरविंद केजरीवालांनी हिंदुत्त्वाची विचारधारा अंगिकारली आहे; ओवेसींची टीका

ओवेसी यांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना अरविंद केजरीवाल हे 2013 चा मोदी आहेत, त्यांनी हिंदुत्वाची विचारधारा अंगीकारली आहे असे म्हटले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर देखील टीका केली.

गुजरात विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले असून यंदा भाजपसमोर काँगेस आणि आम आदमी पक्षाचे आव्हान असतानाच असदुद्दीन ओवेसी यांचा ‘एआयएमआयएम’ पक्ष देखील निवडणूकीच्या रिंगणात उतरला आहे. ओवेसी यांचा पक्ष विधानसभेच्या 12 जागा लढवणार आहे. ओवेसी यांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना अरविंद केजरीवाल हे 2013 चा मोदी आहेत, त्यांनी हिंदुत्वाची विचारधारा अंगीकारली आहे असे म्हटले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर देखील टीका केली.

ओवेसी म्हणाले गुजारतमध्ये 27 वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. येथे काँग्रेस आणि इतर पक्ष मतदाराना भाजपची भीती घालून आपल्या पारड्यात मते घेतात आणि निवडणूकीनंतर त्यांचे बारा तेरा आमदार भाजपमध्ये प्रनेश करतात. गुजरातमध्ये राजकीय पोकळी निर्मान झाली असून ती भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे देखील ते यावेळी म्हणाले.
यावेळी ओवेसी म्हणाले, काँग्रेसची जनमानसातील विश्वासार्हता खराब झाली आहे. तर केजरीवाल नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवून 2013 चे नरेंद्र मोदी झाले आहेत.
केजरीवाल समान नागरी कायद्यावर काहीही बोलत नाहीत. बिल्किस बानोबद्दल काहीच बोलले जात नाहीत, कोविडच्या काळात ते पहिले मुख्यमंत्री होते ज्यांनी तबलीगी जमातवर खोटे आरोप केले. केजरीवाल यांनी हिंदुत्वाची विचारधारा अंगीकारली आहे.
हे सुद्धा वाचा :
Sachi Vaze : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या जामीनावर शुक्रवारी फैसला

Ajit Pawar : अब्दुल सत्तारांना विनाश काले विपरीत बुध्दी; अजित पवारांनी थेट घेतला खरपूस समाचार

Chh. Shivaji Maharaj : छ. शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा भव्य पुतळा प्रतापगडावर उभारणार!

बिल्किस बानोच्या मुद्द्यावर ओवेसी म्हणाले, ‘तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार झाला, तिच्या मुलीची हत्या करण्यात आली. सरकार गुन्हेगारांना सोडते. तुम्हाला बोलायचे नसेल तर बोलू नका, पण तुम्ही धर्मनिरपेक्ष असल्याचा आव आणू नका. ओवेसी म्हणाले की, गुजरातमध्ये आम्ही कोणत्याही पक्षाला सत्तेत येण्यापासून रोखू शकत नाही, मात्र गुजरात विधानसभेत आम्ही आमचा आवाज घुमवू शकतो. आम्ही यूपीमध्येही असेच बोललो होतो, पण तेथील लोकांनी ऐकले नाही. 83 टक्के मुस्लिमांनी अखिलेश यांना मतदान केले, पण निकाल सर्वांसमोर आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!