29 C
Mumbai
Sunday, September 10, 2023
घरराजकीयArvind Kejriwal : ...तर गुजरातमध्ये 'आप'ची सत्ता येणार, केजरीवाल यांचा दावा

Arvind Kejriwal : …तर गुजरातमध्ये ‘आप’ची सत्ता येणार, केजरीवाल यांचा दावा

सगळ्यात बलाढ्य राष्ट्रीय पक्ष म्हणून दबदबा निर्माण करणाऱ्या भाजपने ‘ऑपरेशन कमळ’द्वारे इतर राज्यात सुद्धा हातपाय पसरायला सुरूवात केली असली तरीही ‘आम आदमी पक्ष’ सगळ्याच बाजूने त्यांना पुरून उरत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात सत्ता फोडण्यात भाजपला कमालीचे यश मिळाले असले तरीही स्वतःचा बालेकिल्लाच आता हातातून निसटण्याची शक्यता सध्या सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. पंजाबनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातकडे आपला मोर्चा वळविला असून तिथे जोरदार प्रचारमोहिमेस सुरवात केली आहे. दरम्यान त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने सीबीआयच्या कारवाईचा बडगा उगारला परंतु त्याउलट या कारवाईचा आपल्या पक्षालाच फायदा होत असल्याचा दावा करीत पंजाबनंतर गुजरात दूर नसल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी भाजविरोधात मोहिम हाती घेतली असून भाजपला त्याच्यात घरात घुसून नामोहरण करण्याची तयारी केजरीवाल यांनी युद्धपातळीवर सुरू केली आहे. याचीच एक छोटीशी चुणूक दिल्ली विधानसभेत पाहायला मिळाली. काल (गुरूवारी) दिल्ली विधानसभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल करीत अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभेसाठीच्या लढाईचे रणशिंगच फुंकले आहे. यावेळी त्यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरील सीबीआय कारवाईचा उल्लेख करीत या कारवाईमुळे पक्षालाच मोठा लाभ झाला असून आपच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हे सुद्धा वाचा…

अमित शाह मुंबईत येणार; गणेशोत्सवाच्या खांदयावरून पालिकेच्या निवडणुकीची पेरणी करणार

VIDEO : मुंबई अग्निशमन दलातर्फे गणेशोत्सव मंडळाना अग्नि सुरक्षेचे धडे

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडणार असून भाजपच्या या बालेकिल्यात आपने आपल्या प्रचाराचा वेग कमालीचा वाढवला आहे, त्यामुळे भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. केजरीवालांना आवर घालण्यासाठी भाजपने नेहमीप्रमाणे खेळी करत फोडाफोडीचे राजकार केले परंतु ते जमले नाही म्हणून धडा शिकवण्यासाठी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर सीबीआयने कारवाई केली, परंतु या कारवाईचा आपल्याला काहीच फरक पडला नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या हाताने 2 टक्के मते आमच्या झोळीत टाकली आहेत असा दावाच केजरीवाल यांनी केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राप्रमाणे दिल्लीत सुद्धा भाजपने ऑपरेशन कमळ राबवत आप पार्टीतील आमदारांना पक्षातून फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आता आपकडून आरोप करण्यात येत आहे. तथापी या फोडाफोडीच्या राजकारणाला करारी जवाब देण्यासाठी दिल्लीतील सत्ताधारी आपने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला आणि लगचेच तो संमत सुद्धा करून घेतला. या विश्वासदर्शत ठरावाच्या माध्यमातून केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना थेट ललकारल्याचे पाहायला मिळत आहे.

या संपुर्ण प्रक्रियेवर बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणतात, ‘सिसोदियांवर कारवाई केल्यापासून ‘आप’च्या मतांमध्ये 4 टक्के वाढ झाली असून सिसोदियांना अटक होईल, तेव्हा आणखी दोन टक्के मते तरी वाढतील. समजा सिसोदियांना दोनदा अटक झाली तर, कदाचित गुजरातमध्ये ‘आप’चे सरकार स्थापन होईल’, असे म्हणून गुजरातची लढाई सुद्धा आपच जिंकणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी