30 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरराजकीयराज्यपालांची बातमी दाबण्यासाठी आज ईडी कारवाईचा मुहुर्त, अरविंद सावंतांचा हल्लाबोल

राज्यपालांची बातमी दाबण्यासाठी आज ईडी कारवाईचा मुहुर्त, अरविंद सावंतांचा हल्लाबोल

टीम लय भारी

मुंबई : पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी अधिक चौकशीसाठी ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्यावर आज (दि. 31 जुलै) धाड टाकली. चौकशीसाठी दोनदा समन्स बजावल्यानंतरही राऊत चौकशीसाठी हजर राहिले नाहीत म्हणून ईडीकडून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान ईडी चौकशीवरून राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी संजय राऊत यांची पाठराखण करीत राज्यपालांची बातमी दाबण्यासाठी आज ईडी कारवाईचा मुहुर्त शोधल्याचे म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.

हुतात्मा चौक येथे आज राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याला निषेध दर्शवण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक एकत्र आले होते, यावेळी अरविंद सावंत, रविंद्र मिर्लेकर, मीनाताई कांबळे, राजकुमार बाफना, पांडुरंग सकपाळ, जयश्री बल्लीकर आणि शिवसैनिक याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी माध्यमांकडून उपस्थित अरविंद सावंत यांच्याशी संवाद साधत संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली

माध्यमांशी बोलताना अरविंद सावंत म्हणाले, या कारवाईला राजकीय सूडच म्हणायला पाहिजे. मला सांगा..आजच कसा मुहुर्त काढला हो..काल या राज्याचे महामहिम राज्यपालांनी या महाराष्ट्राचा अपमान केला..मराठी माणसांचा अपमान केला.. मराठी अस्मितेचा अपमान केला. महाराष्ट्राचा ते वारंवार अपमान करत आले. छत्रपती शिवरायांपासून ते सावित्रीबाई फुलेंपासून कालचं हे उदाहरण त्यांचे हे सततचे आक्षेपार्ह वक्तव्य हे संविधानाच्या विरोधात आहे..आणि ती बातमी दाबली जावी म्हणून आजचा मुहुर्त शोधला का तुम्ही.. असा तिखट सवाल यावेळी सावंत यांनी केला आहे.

संजय राऊतांनी लेखी लिहून दिले होते की मी यानंतर तुमच्याकडे येतो.. लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन संपल्यानंतर मी तुम्हाला येऊन भेटतो असे सांगितले होते परंतु राज्यपालांच्या वक्तव्याची बातमी येऊ नये म्हणून आजचाच मुहुर्त त्यांनी शोधला असल्याची टीका अरविंद सावंत यांनी यावेळी केली. सावंत पुढे म्हणाले,  कालपर्यंत जी माणसे भाजपमध्ये गेली त्यांचे काय झाले.. अगदी मुलुंडचा भोंगा बोलतो ना त्याला विचारा त्याने घेतलेली नावं सगळी भाजपमध्ये गेली आहेत.. काय झालं त्यांचं.. महाराष्ट्रात फक्त मराठी माणसं भ्रष्टाचारी का हो.. काहीही झालं तरीही आम्ही लोकशाही पद्धतीनेच निषेध करणार असे म्हणून राजकीय सूडबुद्धीने अडचणीत आणू पाहणाऱ्यांना त्यांनी यावेळी सज्जड दम दिला.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईमुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आपले समर्थन दर्शवण्यासाठी राऊत यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करीत निषेध व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे शिंदे गटातून या कारवाईवर आनंद व्यक्त केला जात आहे. भाजपमधून सुद्धा टिकेचे बाण राऊतांवर आदळत असल्याचे सोशलमिडीयावर दिसत आहे.

हे सुद्धा वाचा..

ज्याच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली, त्याच्यावर कारवाई झाली त्यामुळे आनंद आहे – संजय शिरसाठ

संजय राऊतांच्या ईडी कारवाईवर भाजप नेत्यांकडून यच्छेद तोंडसुख

‘मरेन पण शरण जाणार नाही’, ईडीच्या धाडीनंतर संजय राऊतांचा बाणा कायम

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!