29 C
Mumbai
Wednesday, September 13, 2023
घरराजकीयशिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारेंना देण्यात आले पद

शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारेंना देण्यात आले पद

टीम लय भारी

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला लागलेली गळती आता काही अंशी थांबली असून आज (दि. २८ जुलै २०२२) शाहू-फुले-आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिवबंधन हाती बांधले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या महिला कार्यकर्त्या देखील सोबत होत्या. बेधडक वक्त्या असलेल्या सुषमा अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षाला निर्भीड वक्ता मिळाला आहे.

सुषमा अंधारे यांनी पक्ष प्रवेश करताच त्यांना उद्धव ठाकरे यांनी पद (As soon as she joined Shiv Sena Sushma Andharan was given post) जाहीर केले. उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना उपनेते पद देण्यात आले आहे. यावेळी आमदार आदित्य ठाकरे, आमदार सचिन अहिर, खासदार अरविंद सावंत हे देखील उपस्थित होते. शिवसेनेच्या उपनेत्या आणि विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून सुषमा अंधारे यांच्या हाती शिवबंधन बांधण्यात आले.

ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांचे हिंदुत्व हे शेंडी आणि जानव्यांचे नाही, असे म्हंटले तेव्हाच मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. असे सुषमा अंधारे यांच्याकडून सांगण्यात आले. ‘माझ्या डोक्यावर कुठल्या ईडीचं ओझं नाही आणि मला कुठलेही प्रलोभन नाही.’ असा टोला देखील सुषमा अंधारे यांनी बंडखोरांना लगावला. ‘अनेक जण म्हणाले की, मी टीका केली होती. पण आमचं एकच संविधानिक शत्रू असेल तर मी त्यांचे नेतृत्व स्वीकारायला तयार आहे,’ असेही स्पष्ट मत सुषमा अंधारेंनी व्यक्त केले.

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेत आलेल्या समर्थकांचे शिवसेनेत स्वागत केले. आता पुन्हा एकदा सामान्य शिवसैनिकाला असामान्य बनविण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले. ज्यांना सामान्यातून असामान्य केले, ते पुन्हा सामान्य व्हायला गेले, असे देखील उद्धव ठाकरे यांच्याकडून बोलण्यात आले. दरम्यान, शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारे यांच्या हाती शिवबंधन बांधल्यानंतर त्या भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या.

हे सुद्धा वाचा :

अभिनेता सचिन खेडेकरांनी केले मराठी भाषेबाबत मोठे वक्तव्य

सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे हाती बांधणार शिवबंधन

शिंदे गट – भाजपचे अखेर ठरले! आगामी निवडणुकीत ‘या’ महापालिकेसाठी करणार युती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी