28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयराहुल गांधी, नाना पटोलेंवर टीका भोवली; आशिष देशमुख काँग्रेसमधून निलंबित

राहुल गांधी, नाना पटोलेंवर टीका भोवली; आशिष देशमुख काँग्रेसमधून निलंबित

विदर्भातील काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांना काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर काही दिवसांपूर्वी आशिष देशमुख यांनी जोरदार टीका केली होती. ही टीका त्यांना महागात पडली आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने त्यांच्यावर कारवाई करत निलंबन केले आहे. आशिष जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार अशी चर्चा काही दिवसांपूर्वी होत होती. आता ते कोणता निर्णय घेतात हे पाहावे लागेल.

आशिष देशमुख गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज होते. नाना पटोलेंसोबत त्यांचे पटत नसल्याने ते पटोलेच्या नेतृत्वावर टीका करत असत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली. त्यानंतर काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक पत्रक काढून देशमुख यांना निलंबित केल्याचे जाहीर केले आहे. आशिष देशमुख काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित असणार आहेत. राहुल गांधी आणि पटोले यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांना नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र त्या नोटीसीला देशमुख यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही, त्यामुळे शिस्तपालन समितीने त्यांच्याविरोधात अखेर कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा

UPSC परीक्षेत महाराष्ट्राचा डंका; 70 अधिक उमेदवारांनी पटकावले यश

पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचे युपीएससी परीक्षेत यश; पोलीस आयुक्तांनी केला सत्कार

वडिलांची चहाची टपरी, आई विडीकामगार पोरानं पांग फेडलं; मंगेश खिलारीचे युपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश

आशिष देशमुख यांनी पक्षविरोधी वर्तन आणि जाहीर वक्तव्याबद्दल शिस्तपालन समितीला दिलेले उत्तर समाधान कारक नसल्याचे शिस्तपालन समितीने म्हटले आहे. पक्षविरोधी वक्तव्याची दखल धेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने देशमुख यांना प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांसाठी निलंबित केल्याचे म्हटले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी