28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयभाजपचा पोलखोल शिवसेनेचा डब्बा गोल : आशिष शेलार यांची ठाकरे सरकारवर टीका

भाजपचा पोलखोल शिवसेनेचा डब्बा गोल : आशिष शेलार यांची ठाकरे सरकारवर टीका

टीम लय भारी 

मुंबई : महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी भाजपने (BJP) चेंबूरमध्ये सभेचं आयोजन केलं होतं. दरम्यान, पोलखोल सभेआधीच रथाची तोडफोड करण्यात आली आहे. दगडफेकीचे उत्तर जर प्रशासकीय कारवाईतून मिळालं नाही तर उद्याला जी परिस्थिती होईल त्याला जबाबदार ठाकरे सरकार असेल. आरोपींना पाठीशी घातल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचा ईशारा भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिला आहे. (Ashish Shelar criticizes Thackeray government)

भाजपचा पोलखोल शिवसेनेचा डब्बा गोल ही परिस्थिती मुंबईत आहे.तुम्ही जर पाच वर्ष लोकांची सेवा केली तर त्याचा हिशोब द्या भाजप जनतेच्या न्यायालयात जाऊन पोलखोलच्या माध्यमातून गेल्या 25वर्षाच आणि विशेषत: गेल्या ५ वर्षात पैशाचा अपव्यवहार आणि अत्याचार आणि भ्रष्टाचार हा मुंबईकरांच्या खिशातून आलेल्या पैशातून कसा झाला याचा हिशोब मांडते आहे, असे आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले.

ज्यावेळेला मुद्द्याला उत्तर मुद्द्याने देता येत नाही त्यावेळेला दगडफेक हा डरपोकपणा करावा लागतो.जे दगडफेक करत आहेत त्यांना खुलं आव्हान आहे. तारीख तुम्हारी, दिन तुम्हारा सुबह बोलो शाम बोले शाम दगडफेकीचा अभियान तुम्ही आणि आम्ही दोघं पक्षांनी मिळून करुया, अशी टीका आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे.

हिमंत असेल तर समोर या नामर्दासारखे वागू नका . आणि म्हणून चेंबूरमध्ये लपूनछपून केलेला.नामर्दपणा करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी. दोन आरोपी पकडले आहेत आणखी तीन आरोपी अजून पकडले आहेत असे पोलिसांचे म्हणणे आहे. मुंबई पोलिसांच्या कर्तृत्वाचं यश आम्हालासुद्धा बघायचं आहे.

तीन आरोपी पकडायला कीती वेळ लागत आहे. या सर्व प्रकरणामागे कोण मास्टरमाईंड आहे? याचा बोलविता धनी आणि कटकारस्थान करणारा कटकरी कोण आहे..याची स्पष्टता आम्हाला झाली पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे पोलिसांनी सहकार्य करु म्हणून सांगितलं आहे. त्याबरोबर जे आरोपी पकडले आहेत त्यांना मुंबईतून हद्दपार केले पाहिजे.


हे सुद्धा वाचा :

राज्यात काही पक्ष धार्मिक व जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात : रोहित पवार

Remarks on BMC mayor: Ashish Shelar arrested, released as BJP leaders protest outside police station

जितेंद्र आव्हाडांनी नाशिक म्हाडाचा घोटाळा बाहेर काढला, अन् जनतेसाठी ५००० घरे उपलब्ध झाली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी