29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
HomeराजकीयAshish Shelar : अशिष शेलार म्हणाले, तो राजहंस एक.......

Ashish Shelar : अशिष शेलार म्हणाले, तो राजहंस एक…….

एका तळयात होती बदके पिले सुरेख होते, कुरूपवेडे पिल्लू तयात एक...... पाण्यात पाहतांना चोरुनीया क्षणैक, त्याचेच त्याला कळाले, तो राजहंस एक.....हे ग.दी. माडगूळकर यांचे गाणे अशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या ओळीने आठवते. हंस हा सर्व पक्षांमध्ये अतिशय रुबाबदार पक्षी आहे.

एका तळयात होती बदके पिले सुरेख होते, कुरूपवेडे पिल्लू तयात एक……
पाण्यात पाहतांना चोरुनीया क्षणैक, त्याचेच त्याला कळाले, तो राजहंस एक…..हे ग.दी. माडगूळकर यांचे गाणे अशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या ओळीने आठवते. हंस हा सर्व पक्षांमध्ये अतिशय रुबाबदार पक्षी आहे. त्याची चाल देखील रुबाबदार असते. त्याच्यामध्ये दुध आणि पाणी वेगळे करण्याची क्षमता असते. हंस पक्षाचे सर्वांनाच प्रचंड आकर्षण असते. त्यामुळे कवी देखील हंसाचे रसभरीत वर्णन करतात. त्याच हंसाची उपमा देऊन अशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे ‘कावळा’ असल्याचा टोमणा मारला. तर अमित शहा हे ‘हंस’ आहेत. ‘कौआ हंस की चाल नहीं चल सकता’ असे अशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटले आहे.

कारण उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना आव्हान द‍िले आहे. उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा सल्ला देखली द्यायला ते विसरले नाहीत. त्यांना आरसा घेऊन उभे राहण्याची गरज आहे. ज्यांना आपण आव्हान देतो त्यांच्या ताकदीसमोर आपण कुठे उभे आहोत हे त्यांना कळू शकेल. तुम्ही स्वत:च्या हिंमतीवर एकदातरी महाराष्ट्रात सरकार आणले आहे का असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना यावेळी विचारला. तुम्ही 100 आमदार तरी निवडून आणले का? 100 तर सोडाच 75 चा आकडा देखील तुम्ही पार केला नाही असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लागावला.

अमित शहांनी दोनदा शंभर आमदार निवडून आणले त्यांना तुम्ही आव्हान देता म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे.’ कौआ हंस की चाल नही चल सकता’ असे म्हणत भाजपचे मुंबई अध्यक्ष अशिष शेलार यांनी टीकेचे बाण सोडले. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. पीएफआय प्रकरणात पुण्यात जी घोषणाबाजी झाली. यांच्या वर्तुणुकीला ठेचून काढले पाहिजे अशी मागणी भाजपाच्यावतीने गृहमंत्र्यांकडे केली. पीएफआयवर जी कारवाई केंद्रीय यंत्रणांनी केली ती योग्य आहे. देशात देशविघातक वातावरण निर्माण करण्याचे जाळे विणले जाते. त्याविरोधात हा लढा आहे, असे अशिष शेलार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना खेळायचीय 20-20 मॅच…

India T-20 World Cup Win : भारताच्या टी-20 विश्वचषक विजयाला 15 वर्षे पूर्ण!

Yogi : योगींच्या राज्यात चाललंय काय……

केंद्र सरकारने देश विघातक शक्तींना उखडून टाकण्याचे ठरविले आहे. दोन हजार लोक जमवून उद्धव ठाकरेंनी एकपात्री प्रयोग केला अशीही टीका त्यांनी यावेळी केली. अदित्य ठाकरे वांद्र- वर्सोवाच्या पुढे बोरावली-विरारपर्यंतच्या कोस्टरोडला थांबवू पाहत असून, अदित्य ठाकरे हे प्रकल्प विरोधी आहेत असा घणाघात देखील त्यांनी यावेळी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी