33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
HomeराजकीयAshok Chavan : अशोक चव्हाण – देवेंद्र फडणवीस भेट, अन् इन्कम टॅक्सची...

Ashok Chavan : अशोक चव्हाण – देवेंद्र फडणवीस भेट, अन् इन्कम टॅक्सची धाड !

अशोक चव्हाण (Ashok Chavan) व देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते काल अचानक समोरासमोर आले. अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर आहेत अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर दोघांच्या झालेल्या या भेटीमुळे संशय निर्माण झाला आहे.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) व देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते काल अचानक समोरासमोर आले. अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर आहेत अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर दोघांच्या झालेल्या या भेटीमुळे संशय निर्माण झाला आहे. चव्हाण व फडणवीस यांचे समान मित्र असलेल्या आशिष कुलकर्णी यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी हे दोन्ही नेते तिथे गेले होते. फडणवीस तेथून निघण्याच्या वेळी अशोक चव्हाण हे कुलकर्णींच्या घरी पोहोचले. दोघांची ओझरती भेट झाली. दोघांमध्ये कोणतेही संभाषण झालेले नाही, अशी सारवासारव दोन्ही गटांकडून करण्यात येत आहे.

या भेटीमुळे मात्र साधारण वर्षभरापूर्वीच्या एका घटनेला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आयकर विभागाने म्हणजेच इन्मक टॅक्स खात्याने मुंबईतील ट्रायडंट हॉटेल व अन्य जवळपास २५ – ३० ठिकाणी एकाच वेळी धाडी मारल्या होत्या.

Ashok Chavan : अशोक चव्हाण – देवेंद्र फडणवीस भेट, अन् इन्कम टॅक्सची धाड !

 

हे सुद्धा वाचा

India Vs Pakistan : उद्या पुन्हा होणार भिडंत

Weed Farming : ऊसाच्या शेतात लपवून ‘गांजा’ फुलवला

VIDEO : आदित्य ठाकरेंनी घेतले फोर्टच्या राजाचे दर्शन

एका उद्योजकाशी संबंधित मारलेल्या या धाडीमध्ये राज्य सरकारमधील काही मंत्री, अधिकारी, दलाल यांचे गौडबंगाल चव्हाट्यावर आले होते. जमिनींचे व्यवहार, कंत्राटे यांचे मोठे घबाड त्यावेळी आयकर खात्याला सापडले होते. काही करोडो रुपयांच्या रक्कमेचे व्यवहार, दागिने सुद्धा सापडले होते. जवळपास १००० कोटी रुपयांचे व्यवहार या रॅकेटने केले होते. खुद्द आयकर खात्यानेच जारी केलेल्या पत्रकात ही बाब स्पष्ट केली होती.

एवढ्या मोठ्या कारवाईचे नंतर पुढे काय झाले कुणालाच ठाऊक नाही. आयकर खात्याने हे भलेमोठे प्रकरण गुंडाळून ठेवले होते. सरकारने दडपलेल्या या कारवाईवर प्रसारमाध्यमांनी सुद्धा पाठपुरावा केला नाही. आयकर विभागाने टाकलेल्या या धाडीत तत्कालिन महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रमुख मंत्री असलेल्या अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित दस्तावेज सापडल्याची जोरदार चर्चा त्यावेळी सुरू झाली होती. केंद्रातील भाजप सरकारनेच अशोक चव्हाण यांना लक्ष्य करून ही कारवाई केली होती. पण अशोक चव्हाण यांच्या व्यतिरिक्त अन्य नेत्यांचेही घबाड या कारवाईत सापडले होते.

अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रीपद होते. याच खात्याचा दुसरा भाग म्हणजे सार्वजनिक उपक्रम वगळून असलेले खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत त्यांचीही काही कागदपत्रे सापडल्याची चर्चा आहे. त्यानंतर काही दिवसांनी एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहायक सचिन जोशी यांना नोटीस गेली होती.

या भल्यामोठ्या कारवाईचे पुढे काय झाले कुणाला माहित नाही. परंतु एकनाथ शिंदे यांचे काय झाले ते अख्ख्या देशाने पाहिले. आता विषय उरला आहे, अशोक चव्हाण यांचा.

राधाकृष्ण विखे – पाटील हे अशोक चव्हाण यांचे अत्यंत खास समजले जातात. अब्दुल सत्तार हे सुद्धा अशोक चव्हाण यांचे अत्यंत खास आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण जरी शरिराने काँग्रेसमध्ये असले तरी ते केव्हाच मनाने भाजपमध्ये गेलेले आहेत. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची काही मते फुटली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीच्या वेळी सुद्धा काँग्रेसचे काही मंत्री व आमदार गैरहजर राहिले होते. हे सगळे अशोक चव्हाण यांनीच घडवून आणल्याची चर्चा आहे.

अशोक चव्हाण यांच्या ‘काँग्रेस’निष्ठेविषयी संशयकल्लोळ असतानाच त्यांची आशिष कुलकर्णी यांच्या घरी देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली. भलेही ही भेट चुकून झाली असेल, अन् या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसेल. परंतु अशोक चव्हाण यांच्यासाठी भाजपने केव्हाच गळ टाकून ठेवला आहे. या गळात अशोक चव्हाण केव्हा अडकणार एवढाच प्रश्न आता उरलेला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी