28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयअशोक चव्हाण यांना भाजप प्रवेशाची ऑफर...

अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेशाची ऑफर…

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे काँग्रेस पक्षात काहीच भावितव्य नाही. त्यांचे काँग्रेसमधील भवितव्य अंधःकारमय आहे. त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा, असा प्रस्ताव महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांना दिला आहे. काँग्रेसचा लवकरच कडेलोट होणार आहे. अशोक चव्हाण यांसारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याचे काँग्रेसमध्ये काही भविष्य नाही. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे विखे पाटील म्हणाले. त्यांनी अशोक चव्हाण यांच्यासमोर थेट भाजप प्रवेशाचा प्रस्ताव मांडला आहे. त्या प्रस्तावाला चव्हाण कशाप्रकारे प्रतिसाद देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विखे-पाटलांच्या प्रस्तावावरून राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले आहे. (Ashok Chavan offered to join BJP)

अशोक चव्हाण यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी भाजपचा हा गोंधळ निर्माण करण्याचा डाव असल्याचे म्हंटले आहे. काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी ही खेळी खेळण्यात आली आहे. त्यांनी माझ्याबाबत जो आदर व्यक्त केला आहे त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. पण मलाच आता प्रश्न पडला आहे, की ते माझे मित्र आहेत का शत्रू? अशा उपरोधिक शब्दांत चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकारवर विखे-पाटील यांनी
हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, “महाविकास सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते. माविआ सरकारमधील सदस्य आरोप प्रत्यारोप करण्यात मश्गुल होते. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर बजबजपुरी माजली होती. काँग्रेसच्या अधःपतनास राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करत होते. अशोक चव्हाणांसारख्या दिग्गज नेत्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे विखे-पाटील म्हणाले.

२०१९ साली राधाकृष्ण विखे-पाटील हे विरोधी पक्ष नेते होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विखे-पाटील यांनी आपला मुलगा सुजय विखे-पाटील यांना अहमदनगर मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी केली होती. पण या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला होता. त्यानंतर नाराज झालेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सुजय विखे-पाटील अहमदनगरमधून भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले होते.

हे सुद्धा वाचा

घटनाबाह्य सरकारबाबत घटनापीठाने निर्णय घ्यावा – संजय राऊत

मोदींचा मनमानी कारभार : सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

भारतातील ट्विटरच्या दोन कार्यालयांना लागणार टाळे; मस्क यांचा चिंताजनक निर्णय

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी