33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयविधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव

विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीने सुरुवातीपासूनच आक्रमकपणे सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरले आहे. उद्या हिवाळी अधिवेशनाचा अंतिम दिवस असताना गुरूवारी (दि. २९) रोजी महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या विरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव  (No-confidence motion) आणला आहे. या ठरावाचे पत्र विधिमंडळ सचिवांना सादर केले आहे. आमदार सुनिल केदार, सुनिल प्रभू, अनिल पाटील आणि सुरेश वडपूरकर यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या अविश्वासाचे पत्र विधिमंडळ सचिवांना दिले आहे. (Maharashtra Legislature Winter Session 2022)

अधिवेशनादरम्यान विरोधीपक्षांच्या सदस्यांना बोलू देत नसल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या आमदारांकडून होत आहे. त्यामुळे विरोधीपक्ष नाराज होते. या पार्श्वभूमीवरच आज अविश्वास ठरावाच्या प्रस्तावाचे पत्र विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांना सादर करण्यात आले आहे. मविआच्या ३९ हून आमदारांच्या सह्या असल्याची सुत्रांनी माहिती दिली.
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी काही सदस्यांनी बोलू देण्याची विनंती केल्यानंतरही अध्यक्षांनी परवानगी दिली नव्हती. त्यामुळं आमदारांमध्ये नाराजी वाढू लागली होती.
हे सुद्धा वाचा

धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ हजार रुपये बोनस; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ‘स्वाधार’सारखी योजना लागू होणार; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

त्यांची नजर वाईट, यापुढे आरएसएसने सावध राहण्याची गरज : उद्धव ठाकरे

आज देखील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. विरोधकांना सभागृहात बोलण्याची संधी दिली जात नाही त्यामुळे आम्ही अविश्वास ठराव आणणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज म्हटले होते.दरम्यान सत्ताधारी पक्षांकडे बहुमत असल्यामुळे या प्रस्ताव मंजूर होणार का याबाबत शक्यता कमी असली तरी आता या प्रस्तावामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी