35 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रविरोधक मुद्यावरुन थेट गुद्यावर

विरोधक मुद्यावरुन थेट गुद्यावर

टीम लय भारी

मुंबईः राज्यातल्या राजकारणाला आता वेगळे वळण लागले आहे. शिवसेना विरुध्द शिंदेगट शिवसेना यांच्यात इतके दिवस मुद्यावरुन सुरु असलेला वाद थेट गुद्यावर आला आहे. काल रात्री शिवसैनिक बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या गाडीवर गुरुवारी रात्री अज्ञातांनी हल्ला केला. त्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उदध्व ठाकरे यांनी भायखळा येथील 208 नंबरच्या शाखेला भेट दिली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांवर ओढावलेली आपबिती ऐकून घेतली. त्यांच्यासोबत त्यांचे निष्ठावंत शिवसैनिक देखील उपस्थित होते.

हल्ल्यानंतर आमची तक्रारही पोलिसांनी घेतली नाही, असे  शिवसैनिकांनी उध्दव ठाकरेंनी सांगितले. त्यावर पोलीस ठाण्याचे इनचार्ज कोण आहेत असे विचारत पोलिसांनी राजकारणात पडू नये, असे ठणकावून सांगितले. शिवसैनिकाच्या केसालाही धक्का लागता कामा नये. या प्रकरणाचार शोध किती काळ सुरु राहील.आतापर्यंत अशा गोष्टी झाल्या नव्हत्या. काही बरं वाईट झाले तर तुम्ही जबाबदार राहाल असे पोलिसांना सुनावले.

आपल्याकडे कर्ते करवीते उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना जावून विचारा असेही उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले.पोलिसांनी राजकारणात पडू नये. ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. जमत नसेल तर हात वर करा. आम्ही आमचे संरक्षण करु.याच्यामध्ये त्यांचा हात आहे. असा सुगावा तुम्हाला लागलाय का? असा प्रश्नही उध्दव ठाकरेंनी पोलिसांना विचारला. हे राजकारण नाही. हे सूडाचे राजकारण आहे. या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे गटाचा हात असल्याचा संशय उध्दव ठाकरेंच्या बोलण्यातून व्यक्त होतांना दिसत आहे. मात्र त्यांनी याची चैकशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यास सांगितले आहे.

हे सुध्दा वाचा:

सैनिक आपसात का भिडताहेत?

भीती खरी ठरली! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावर आता शिंदे – फडणवीस सरकारची नवी खेळी

घटस्फोटाचे कारण बनले ‘मंगळसूत्र’, वाचा सविस्तर…

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी