27 C
Mumbai
Sunday, September 24, 2023
घरराजकीयकेसरकर शिक्षणमंत्री असून किती अशिक्षित आहात; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

केसरकर शिक्षणमंत्री असून किती अशिक्षित आहात; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

कर्नाटकात सरकार स्थापन होऊन भाजपला तेथे विरोधीपक्ष नेता निवडता आलेला नाही. पंतप्रधान मोदी देश चालविण्यात अपयशी ठरले आहेत. तर महाराष्ट्रात अजूनदेखील पालकमंत्र्यांची निवड करता आलेली नाही. एका एका मंत्र्याकडे पाच सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद आहे, असे म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचा समाचार घेतला. काँग्रेसला विरोधीपक्ष नेता निवडता येत नाही देश काय चालवणार अशी टीका त्यांनी केली होती. त्यावर लोंढे यांनी हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिले.

अतुल लोंढे म्हणाले, केसरकर यांनी शिंक्षणमंत्री असून देखील ते किती अशिक्षित आहात हे त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून दाखवून दिले आहे. दिपक केसरकर यांचा समाचार घेताना त्यांनी मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यावर देखील प्रहार केला. कर्नाटकमध्ये जर भाजपला विरोधीपक्ष नेता निवडता येत नसेल तर पंतप्रधान मोदींना काय म्ह्णायचे, तर दुसरीकडे एकानाथ शिंदे सत्तेत आल्यानंतर ४० दिवस त्यांना मंत्रीमंडळ विस्तार करता आलेला नव्हता. आता वर्ष झाले तरी देखील पालमंत्री निवडता आलेले नाहीत. त्यामुळे शिंदे गटाला महाराष्ट्र आणि नरेंद्र मोदी यांना देश चालवता येत नाही, हे जनतेने ओळखल्यामुळेच भीतीपोटी केसरकरांच्या मनातले शब्द बाहेर पडल्याची टीका लोंढे यांनी केली.

हे सुद्धा वाचा 
सकाळी लवकर उठून उशिरापर्यंत काम मंत्र्यांना करावेच लागते; अनुपस्थितीवरून बाळासाहेब थोरात यांनी केली कानउघाडणी 

रस्त्याची कामे निकृष्ट झाल्यास, कंत्राटदार, अधिकाऱ्यावर कारवाई करा – मुख्यमंत्री शिंदे 

३३ कोटी वृक्ष लागवड; जयंत पाटलांच्या निशाण्यावर वनमंत्री मुनगंटीवार  

दरम्यान काल शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदि काँग्रेसचे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले आठवडाभरात विरोधी पक्षनेता निवडला जाईल. त्यामुळे आता आठवड्याभरात काँग्रेसकडून विरोधीपक्ष नेत्यावर शिक्कामोर्बत होण्याची शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी