29 C
Mumbai
Saturday, December 3, 2022
घरराजकीयRavi Rana-Bachhu kadu conflict : बच्चु कडू यांचा शिंदे, फडणवीसांना कोर्टात खेचण्याचा...

Ravi Rana-Bachhu kadu conflict : बच्चु कडू यांचा शिंदे, फडणवीसांना कोर्टात खेचण्याचा इशारा

रवी राणा आणि 'प्रहार'चे आमदार बच्चू कडू यांच्यातील ठिणगीने आता वणव्याचे स्वरूप धारण केले आहे. हा वणवा आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दाराशी पोहचला आहे. राणा यांनी बच्चु कडू यांच्यावर गुवाहाटीला जावून कोट्यवधीं रुपये घेतल्याचा आरोप केल्यानंतर बच्चु कडू आता भलतेच संतप्त झाल्याचे दिसत आहे.

रवी राणा आणि ‘प्रहार’चे आमदार बच्चू कडू यांच्यातील ठिणगीने आता वणव्याचे स्वरूप धारण केले आहे. हा वणवा आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दाराशी पोहचला आहे. राणा यांनी बच्चु कडू यांच्यावर गुवाहाटीला जावून कोट्यवधीं रुपये घेतल्याचा आरोप केल्यानंतर बच्चु कडू आता भलतेच संतप्त झाल्याचे दिसत आहे. रवी राणा आणि बच्चुकडू यांच्या या वादामुळे राजतकीय वातावरण ढवळून निघाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्याचा ताप वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याचे कारण म्हणजे बच्चु कडू यांनी कोर्टात जाण्याचा दिलेला इशारा, देत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देखील नोटीस देणार असल्याचे म्हटले आहे. बच्चु कडू यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत येत्या 1 तारखेपर्यंत पुरावे देण्याची मागणी देखील केली आहे.
पत्रकार परिषदेत आमदार बच्चु कडू म्हणाले, रवी राणा यांनी केलेल्या आरोपांमुळे एकट्या बच्चू कडूंच्या नाही तर ५० आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
रवी राणा यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत. त्यांनी पुरावे न दिल्यास वेगळा निर्णय घेऊ, जर एका बापाची औलाद असेल, तर तो पुरावे देईल. जर नाही दिले तर त्याच्या (रवी राणांच्या) नावाची आम्ही घोषणा करणार, कोणावर आरोप करताना पुरावे असेपर्यंत बोलून नये, असा साधारण नियम आहे, असे बच्चू कडू म्हणाले. राणांच्या आरोपानंतर मला सात ते आठ आमदारांचा फोन आला. राणांनी केलेल्या आरोपावर त्यांनी पुरावे द्यावे, नाहीतर आम्ही वेगळा निर्णय घेऊ, असा इशारा देखील त्यांनी दिला.
आमदार बच्चु कडू आणि रवी राणा यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे राजकीय वातावरणात देखील चर्चांना उधाण आहे. राणा हे तसे भाजपच्या जवळचे समजले जातात मात्र तरी देखील बच्चु कडू आणि राणा यांच्यातील हा वाद अद्यापही मिटलेला नाही, त्यामुळे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढाकार घेऊन त्यांच्यातील सुरू असलेला संघर्ष मिटवतील का अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. असे असले तरी सध्या बच्चु कडू हे प्रचंड संतप्त झाले असून त्यांनी आता कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. राणा यांनी पुरावे न दिल्यास कोर्टात जावू आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील नोटीस पाठवण्याचा इशारा आमदार बच्चु कडू यांनी दिला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!