32 C
Mumbai
Wednesday, March 15, 2023
घरराजकीय'बाळासाहेबांची शिवसेने'चा भला मोठा फलक, पण त्यात बाळासाहेबांच्या फोटोचा विसर ! ;...

‘बाळासाहेबांची शिवसेने’चा भला मोठा फलक, पण त्यात बाळासाहेबांच्या फोटोचा विसर ! ; फलकावर सटरफटर नेत्यांच्या फोटोला मानाचे स्थान

बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी बाळासाहेबांनीच उभारलेल्या शिवसेनेविरोधात बंड (Revolt against Shivsena) पुकारून भाजपसोबत सत्तेत बसलेल्या ‘बाळासाहेबांच्या शिवसेने’ला खुद्द बाळासाहेब ठाकरे यांचाच विसर पडलेला दिसत आहे. याला नियतीची क्रूर चेष्टा म्हणायची की कृतघ्नपणा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील बालेकिल्ल्यात कॅडबरी नाक्यावर भला मोठा फलक लावण्यात आला आहे. या फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांची तितकीच भली मोठी हसरी छबी झळकत आहे. पण यावर बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र अथवा साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही. हा फलक बघताच क्षणी ही भविष्यातील राजकीय स्थित्यंतराची नांदी तर नाही ना? अशी शंकेची पाल मनात चूकचकते… (‘Balasaheb Shivsena’ fogot balasaheb ingratitude towards him)

ठाण्यातील कॅडबरी नाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या आनंदमय शुभेच्छा देणारा भला मोठा फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ४ फेब्रुवारीला खासदार श्रीकांत शिंदे यांचा तर ९ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी रायगड संपर्क प्रमुख प्रकाश अर्जुन देसाई यांनी हा फलक लावला आहे. या फलकावर सटरफटर नेत्यांच्या फोटोला मानाचे स्थान देण्यात आले आहे. पण बाळासाहेबांच्या फोटोसाठी जागा नाही. उद्योग मंत्री उदय सामंत आणि आमदार भरत गोगावले यांचे छायाचित्रही झळकत आहे. आपल्या नेत्यांचा वाढदिवस म्हणजे आपल्या निष्ठेचे जाहीर प्रदर्शन करण्याची जणू काही संधीच या कार्यकर्त्यांना असते. पण अतिउत्साहाच्या नादात राजापेक्षाही आपण राजनिष्ठ कसे आहोत हे आपल्या नेत्याच्या मनावर बिंबवण्याचा या कार्यकर्त्यांचा प्रयत्न असतो. पण या उत्साहाच्या भारत कित्येकदा राजकीय तर्कवितर्कांना उधाण येते याचे साधे भान कार्यकर्त्याना राहत नाही.

हे सुद्धा वाचा 

देशात सरकार कुणाचे? मोदींचे की अदानीचे? बिर्ला-इंदिरा गांधी यांच्या किश्श्याची चर्चा!

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या पायात घातला कोलदांडा

अग्रलेख : आमदार तुपाशी, जनता उपाशी, महाराष्ट्राची मात्र धुळधाण !

फलकावर बाळासाहेबांचा प्रभाव ‘दिसत’ नाही
नुकताच विधान भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांमुळेच माझ्यासारखे सर्वसामान्य शिवसैनिक या विधानसभा आणि लोकसभेपर्यंत पोहोचू शकले. बाळासाहेबांच्या विचारांचा पगडा आणि प्रभाव आमच्यावर होता. त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो, असे म्हंटले होते. पण एकनाथ शिंदे यांच्यावरील बाळासाहेबांचा प्रभाव ठाण्यातील या फलकावर तर कुठे जाणवत नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी