24 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeराजकीयबाळासाहेब ठाकरेंच्या नावाचं केंद्र मुंबई विद्यापीठाच्या खुराड्यात भाजप - शिंदेंच पुतणामावशीचं प्रेम

बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचं केंद्र मुंबई विद्यापीठाच्या खुराड्यात भाजप – शिंदेंच पुतणामावशीचं प्रेम

मुंबई विद्यापीठात बारावीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भेट देण्यासाठी गेले असता लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी तेथील बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रला भेट दिलेली आहे.

मुंबई विद्यापीठात बारावीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भेट देण्यासाठी गेले असता लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी तेथील बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रला भेट दिलेली आहे(balasaheb thackeray centre located in mumbai university). पण ही भेट दिल्यानंतर त्या केंद्राची सद्यस्थिती समजायला फार मदत झाली. बाळासाहेब अध्यासन केंद्राची फार दुर्दशा झालेली असून अद्याप तिथे विद्यार्थ्यांशी संबंधित कुठलीच अॅक्टिव्हिटी सुरू झालेली नाहीये. एकनाथ शिंदे यांकडे स्वतःच्या प्रसिध्दीसाठी, कंत्राटदारांना देण्यासाठी पैसे आहेत पण बाळासाहेबांच्या अध्यासन केंद्रासाठी मात्र पैसे नसल्याचे दिसत आहे. या विभागाचे सुनिल पाटील हे डायरेक्टर असून लवकरच या केंद्राकडे लक्ष दिले जाईल अद्याप तेथे काही कार्यक्रम आपण घेत नसल्याची माहिती त्यांनी संपादक तुषार खरात यांना दिली. त्यामुळे एकनाथ शिंदेंची जी फुटिर शिवसेना आहे त्यांनी केवळ बाळासाहेबांच्या नावाचा वापर करून घेत त्यांच्या नावाने सुरू केलेल्या या शैक्षणिक उपक्रमाला हातभार लावणा-या केंद्राकडे कसे सोयीने दुर्लक्ष केले आहे, हे यातून सिद्ध होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी