29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयनाना पटोलेंचे कारस्थान कॉंग्रेसच्या मुळावर, बाळासाहेब थोरातांचा राजीनामा !

नाना पटोलेंचे कारस्थान कॉंग्रेसच्या मुळावर, बाळासाहेब थोरातांचा राजीनामा !

विधानपरिषद नाशिक विभाग पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या उमेदवारीवरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या गोंधळामुळेच आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. (Nana Patole’s conspiracy at the root of Congress, Balasaheb Thorat’s resignation!)

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये (Congress)अंतर्गत गटबाजी सुरू होती. यामुळेच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आता विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा केली जात आहे. आता याप्रकरणी काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस असून, त्याच दिवशी त्यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चेमुळे काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप आला आहे.

याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे, बाळासाहेब थोरात यांनी असा कोणताही राजीनामा दिल्याची माहिती आम्हाला मिळालेली नाही. त्यांनी राजीनामा दिला नसल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली. मला त्यांनी दिलेल पत्र दाखवा. बाळासाहेब थोरात यांची तब्येत चांगली नाही त्यामुळे ते कोणाशी बोलत नाहीत. हे काँग्रेस विरोधात राजकारण सुरू आहे, राज्यात काँग्रेसला यश मिळत आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

प्रदेश काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आलाय. सत्यजित तांबेंच्या वतीनं आता त्यांचे मामा बाळासाहेब थोरात दंड थोपटून मैदानात उतरलेत. नाना पटोले यांच्या विरोधातली नाराजी त्यांनी बोलून दाखवली. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेत्याचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : सत्यजित तांबे यांच्या बंडानंतर अहमदनगर काँग्रेसमध्ये मोठ्या उलथापालथी

मुलांच्या शिक्षणाची काय व्यवस्था आहे? बाळासाहेब थोरात यांचा सवाल

नाना पटोले यांची हकालपट्टी करा, कॉंग्रेसमधून होतेय मागणी

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत खदखद दिसून येऊ लागली आहे. अशातच नाशिक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही घडलं त्यानंतर काँग्रेसमध्ये नेत्याची नाराजी बाहेर दिसू लागली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीवेळी पक्षाने दिलेल्या चुकीच्या एबी फॉर्मवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. याशिवाय बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यांच्या या पत्रानंतर पक्षासह राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी