30 C
Mumbai
Tuesday, March 26, 2024
Homeराजकीयबारसू रिफायनरीवरून महाविकास आघाडीचा आक्रमक पवित्रा ; ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक

बारसू रिफायनरीवरून महाविकास आघाडीचा आक्रमक पवित्रा ; ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक

रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण तापले असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला जोरदार विरोध दर्शविला आहे. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध असेल तर तो होऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्यावर महाविकास आघाडीतील नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण तापले असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला जोरदार विरोध दर्शविला आहे. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध असेल तर तो होऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्यावर महाविकास आघाडीतील नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.

शिंदे-फडणवीस सरकारला या प्रकल्पावरून जालियनवाला बाग सामूहिक हत्याकांड करायचे आहे, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याकडे लक्ष देऊन सरकारने हा प्रकल्प हाती घ्यावा, असे मत व्यक्त केले. स्थानिकांच्या प्रकल्पाबद्दल काही अडचणी असतील तर त्या दूर करूनच रिफायनरी प्रकल्प राबवावा, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.

बारसू रिफायनरीसाठी जनतेवर दंडेली कराल तर याद राखा, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. या प्रकल्पाविषयी स्थानिक जनतेच्या मनात शंकां असतील तर सरकार त्याचे निरसन का करत नाही, असा सवाल त्यांनी केला. पोलिसांचा फौजफाटा घेऊन सर्वेक्षण करणे ही दडपशाही खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. बारसू रिफायनरी प्रकल्पावरून स्थानिक नागरिकांचे आंदोलन सुरू असताना सरकार दडपशाही करीत असल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. बारसू रिफायनरीमध्ये कोणाचे हितसंबंध अडकले आहेत काय? असा सवालही त्यांनी केला. सरकारने स्थानिक लोकांची दडपशाही आणि प्रकल्पाचे सर्वेक्षण तात्काळ थांबविण्याची मागणी त्यांनी केली.

बारसू येथील रिफायनरीसाठी जमिनीचे सर्व्हेक्षण सुरू असल्याने स्थानिक नागरिकांनी विरोध सुरू केल्यानंतर प्रशासनाने काही महिलांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मातोश्रीवर सर्व ठाकरे गटाच्या खासदारांची तातडीची बैठक घेतली. या मुद्यावर आंदोलनाची भूमिका ठरविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

बारसू रिफायनरी प्रकल्पावरून सरकार दडपशाही करीत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही त्यावर प्रत्युत्तर दिले. उदय सामंत यांनी बारसू प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांनीच दिलेल्या पत्राचा दाखला दिला. आधी प्रकल्पाचे समर्थन करायचे आणि नंतर स्थानिकांनी आंदोलन केल्याचे सांगून प्रकल्पाला विरोध करायचा, अशी दुटप्पी भूमिका उद्धव ठाकरे घेत असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला.

हे सुध्दा वाचा :

राज्याच्या तिजोरीत खडखडाट; धनादेशांचे वितरण रोखले!

बारसू रिफायनरी प्रकरण: आम्ही शेतकरी आहोत दहशतवादी नाही; शेकडो ग्रामस्थांचा आक्रोश

खारघर उष्माघात मृत्यू प्रकरणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

भाजप आमदार नितेश राणे यांनीही बारसू प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. रिफायनरीला विरोध करणे ही उद्धव ठाकरेंची जुनी सवय असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले. उद्धव ठाकरेंनी कोकणातल्या ज्या ज्या प्रकल्पांना पहिला विरोध केला, काही काळानंतर तेच त्यांच्या समर्थनात उतरले असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंच्या विरोधाची किंमत ज्यादिवशी मोजली जाईल त्या दिवशी त्यांचे प्रकल्पाला समर्थन मिळेल. उद्धव ठाकरे यांना प्रकल्पाला विरोध करून आपली किंमत वाढवायची आहे. चेकवरचे आकडे वाढविण्यासाठी त्यांनी राज्यपालांना भेटण्याची तयारी चालविली असल्याची टीकाही नितेश राणे यांनी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी