23 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
HomeराजकीयDevendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर...

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना महत्वाचे स्थान राहिलेले नाही. राज्यभरातच अशी स्थिती आहे.

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना महत्वाचे स्थान राहिलेले नाही. राज्यभरातच अशी स्थिती आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा हेच चित्र आहे. परंतु सातारा भाजपमधील निष्ठावंत विरूद्ध उपरे असा वाद उफाळून आला आहे.

‘या ‘महाभारतामागे भारतीय जनता पक्षाचाच हात

या पार्श्वभूमीवर ‘लय भारी’सोबत भाजपच्या विविध निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. वाई येथे काशिनाथ शेलार व अविनाश फरांदे या भाजप निष्ठावंतांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली. पक्षात गुन्हे करणारे, भ्रष्टाचार करणारे मोठ्या संख्येने आले आहेत. जयकुमार गोरे यांना लगेचच निलंबित करायला हवे. परंतु सध्या सातारा भाजपवर त्यांचेच वर्चस्व आहे. देवेंद्र फडणवीस धुरंधर नेते आहेत. तरी सुद्धा ते असे वागतात हे आश्चर्यकारक आहे.

Supriya Sule : ‘भारतीय जनता पक्ष लाँड्री झालाय!’ सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

हा पक्ष अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुुंडे यांनी वाढवला आहे. निष्ठावंतांना विश्वासात घेतले जात नसल्याने विधानसभा निवडणुकीत त्याचा विपरीत परिणाम होईल, अशी भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

यंदा नाशिकच्या रिंगणात तब्बल बारा पक्ष अन् दहा अपक्ष

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी